‘नव्याना संधी मिळायला हवी’, रोहित-कोहलीच्या निवृत्तीवर काय म्हणाले शरद पवार?

Sharad Pawar Reaction ROKO Retirement: टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये साऊथ आफ्रिकेचा दणदणीत पराभव केला. यानंतर दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी निवृत्ती जाहीर केली. यानंतर जगभरातून प्रतिक्रिया येत आहे. दोन्ही दिग्गजांना जगाच्या कानाकोपऱ्यातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. दरम्यान राष्ट्रवादी पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

एकेकाळी जगाच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका त्यांचं वेगळं स्थान होतं. अलीकडे भारतीय संघाने आपले वेगळे स्थान निर्माण केलं. टी ट्वेंटी विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला अधिक वेळ लागला, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. सुरुवातीला धावसंख्या पाहिल्यानंतर चिंता वाटावे अशी स्थिती होती. जसप्रित बुमरा सिंग आणि सुर्यकुमार यादव चांगली कामगिरी केली. टी 20 च्या विजेत्या दुष्काळातून भारताची मुक्तता झाली आहे.तसेच द्रविडने खेळाडूंना योग्य प्रकारचे मार्गदर्शन केले, असेही ते म्हणाले. 

रोहित शर्मा विराट कोहली दोन्ही अतिशय उत्तम खेळाडू आहेत. ते t20 मधून रिटायर्टमेंट घेत आहेत. फॉर्ममध्ये असतानाच रिटायरमेंट घेणं योग्य असतं. दोघांचाही जागतिक क्रिकेटमध्ये योगदान आहे. नव्याना संधी मिळायला हवी. माझ्या मते हा निर्णय योग्य होता, असे शरद पवार म्हणाले. सचिन तेंडुलकर निवृत्त झाले आणि अनेकांना प्रोत्साहित केले. या दोघांचा निर्णय बरोबर आहे मी त्यांचे अभिनंदन करतो, असेही पवार म्हणाले.

हेही वाचा :  Beed Lok Sabha Election 2024: पंकजा मुंडे की बजरंग सोनावणे? कोणाकडे जास्त संपत्ती?

चालणार नाही, मी स्वागतासाठी 

पंढरपूरला जाणारी वारी माझ्या गावावरून जाते. त्या ठिकाणी स्वागतासाठी एक दिवस मी थांबणार आहे. त्यांच्यासोबत मी चालणार नाही स्वागतासाठी आहे.  बारामती ते सणगर वारीत चालणार ही बातमी खोटी असल्याचे ते म्हणाले. 

3 महिने हातामध्ये

आमचं लक्ष एकच आहे अर्जुनाला जसा डोळा दिसत होता, तशी आमच्यासाठी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आहे. यात काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार उद्धव ठाकरे एकत्र लढणार आहेत. यासंदर्भात जागा वाटपाची चर्चा लवकरच होईल, असे ते म्हणाले. 3 महिने हातामध्ये आहेत, असे त्यांनी सांगितले. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

तरुणाला 30 दिवसात 5 वेळा सर्पदंश, मावशीच्या घरी जाऊन लपला तर साप तिथेही पोहोचला

Ajab Gajab : सर्पदंशाच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. विषारी साप चावल्याने मृत्यू झाल्याचंही आपण …

‘कार्यकाळाची तिसरी टर्म म्हणजे तीन पटीने प्रगती’ विरोधकांच्या गदारोळात पीएम मोदींचं उत्तर

PM Modi Lok Sabha Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद …