Monsoon Updates : वरुण राजाचं आज महाराष्ट्रातील ‘या’ भागात आगमन?, विदर्भासह नागपुरात येलो अलर्ट

Maharashtra Weather News : मान्सून 4 जूनला गोव्यात धडकलं असून महाराष्ट्रातील आगमनासाठी काही तास उरली आहेत. मॉन्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पोहोचला असून आज तळ कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, धाराशिव जिल्ह्यातही वरुणराजा येण्याचा अंदाज आहे. तर विदर्भाचा काही भाग वगळता बहुतांश महाराष्ट्रात मान्सूनची प्रगतीचे संकेत 10 जूनपर्यंत असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितलंय. तर आज विदर्भासह संपूर्ण नागपुरात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. 

दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत गुरुवार ते रविवारपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय. यावेळी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील, असा अंदाज वर्तविण्यात आलाय. यासोबतच राज्याच्या इतर भागातही चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने सांगितलंय. 

मान्सून दाखल होण्यापूर्वीच मान्सूनपूर्वी पावसाने  पुणे, सांगली, सोलापूरसह राज्याच्या विविध भागांत थैमान घातल्याचा पाहिला मिळाला. पुण्यात जणू ढगफुटी झाली असंच काहीस चित्र होतं.  जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, धाराशिव, अमरावती, बुलडाणा, वर्धा, गोंदिया जिल्ह्यातही वरुणराजा बरसला. 

हेही वाचा :  मंत्रिमंडळ बैठकांना दांडी मारण्यात गडाख, शिंगणे, सामंत आघाडीवर

वादळी पावसाचा इशारा या भागाला येलो अलर्ट 

कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाडातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, परभणी, हिंगोली आणि विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली येलो अलर्ट जरी करण्यात आलाय.
 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

योग्य ती वेळ…! रोहित विराटच्या ‘निवृत्ती’वर शरद पवारांनी साधलं ‘टायमिंग’, म्हणाले…

Rohit Sharma Virat Kohli Retirement : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनलच्या थरार अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत …

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुण्यातील (Pune) लोणावळा (Lonavla) येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी …