Mohan Bhagwat : मणिपूर हिंसेवरून मोहन भागवतांकडून मोदींचं नाव न घेता स्पष्ट इशारा; म्हणाले…

Mohan Bhagwat PM Modi : देशात तिसऱ्यांदा सत्तास्थापनेत यशस्वी ठरलेल्या एनडीए आघाडीच्या वतीनं नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ ग्रहण करत पदाची जबाबदारी स्वीकारली. ज्यानंतर कार्यभाराच्या पहिल्याच दिवशी मोदींनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत पहिली स्वाक्षणी पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या 17 हफ्त्यासंदर्भातील निर्णयावर केली. एकिकडे देशातील सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार असल्याची ग्वाही देत असतानाच दुसरीकडे पंतप्रधानांचं नाव न घेता तरीही त्यांच्यापर्यंत आपला संदेश पोहोचवण्याच्या उद्देशानं सरसंघचालक मोहन भागवत यांनी लक्षवेधी वक्तव्य केलं. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर वर्षभरानंतरही अशांततेचीच परिस्थिती असल्यासंदर्भात चिंता व्यक्त केली. संघर्षामुळं प्रभावित झालेल्या देशातील या पूर्वोत्तर राज्यातील स्थितीविषयी प्राथमिकतेनं विचार केला गेला पाहिजे असं ठाम मत त्यांनी मांडलं. संघाच्याच एका सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी देशाच्या विविध भागांमध्ये आणि समाजामध्ये संघर्ष आणि अशांततेची स्थिती असणं योग्य नसल्याचा मुद्द अधोरेखित केला. 

घोषणाबाजीपासून दूर या… 

देशातील विविध ठिकाणी आणि विविध समाजांमध्ये असणारा संघर्ष चांगला नाही, त्यामुळं त्यांनी (सत्ताधाऱ्यांनी) निवडणूक आणि राजकीय घोषणाबाजीपासून दूर येत देशासमोर उभ्या राहिलेल्या समस्यांवर लक्ष केंद्रीय करण्यावर भर देण्याचं वक्तव्य केलं. ‘गेल्या वर्षभरापासून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होण्याचीच प्रतीक्षा अनेकजण करत आहेत. दशकभरापूर्वी तिथं इतकी शांतता होती, की तिथं बंदूकिची संस्कृतीच नाहीशी झालीय असं वाटत होतं. पण, अचानकच या राज्यात हिंसा वाढली. ज्यामुळं येथील परिस्थितीचा प्राथमिकतेनं विचार करणं अपेक्षित आहे’, असं ते म्हणाले. 

हेही वाचा :  शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बॅंक खात्यात 2-2 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला मिळाले का?

 

मणिपूरमध्ये अशांतता भडकली किंवा भडकवण्यात आली. पण, वस्तुस्थिती हीच आहे की मणिपूर धुमसतंय आणि त्याचा दाह अनेकांना सोसावा लागतोय, असं म्हणताना मणिपूरमध्ये मेइती आणि कुकी समुदायांमधील संघर्षापासून मृतांच्या वाढत्या आकड्यापर्यंतच्या गोष्टींवर भागवतांनी प्रकाश टाकला. 

सध्याच्या घडीला देशात निवडणुकीचा निकाल लागून आता सत्ताही स्थापन झाली आहे. त्यामुळं आता काय आणि कसं झालं, या वायफळ चर्चांपासून दूर राहता येऊ शकतं. संघटना कायमच मतदानाचं मगत्त्वं आणि त्याविषयीच्या जागरुकतापर कार्यांमध्ये कर्तव्य बाजवते. पण, प्रत्यक्षात मात्र सत्ताधारी आणि विरोधकांनी परस्पर सामंजस्यानं सामान्यांसाठी काम सकरणं अपेक्षित असल्याची महत्त्वपूर्ण बाब बोलून दाखवली. 

निवडणुकीविषयी भागवतांचं ठाम मत… 

निवडणुकीमध्ये बहुमत मिळवणं हा हेतू असला तरीही ही एक स्पर्धा असून, ते युद्ध नाही हा मुद्दा मोहन भागवत यांनी मांडला. सध्या नेते आणि पक्ष एकमेकांवर दुषणं लावत आहेत. पण, त्यांच्या अशा वागण्यामुळं समाजामध्ये असणारी दरी आणखी रुंदावत आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाहीय, असं म्हणत त्यांनी संघाला विनाकारण काही मुद्द्यांमध्ये गोवलं जात असल्यावर नाराजी व्यक्त केली. 

निवडणुकीत कायम दोन पक्ष असतात खरं, पण जिंकण्यासाठी कधीच असत्याचा आधार घेवू नये. सध्याच्या घडीला तंत्रज्ञानाचा वापर करत असत्याला सत्याचं रुप देत सादर करण्यात आल्याचं म्हणत त्यांनी यावेळी चिंतेचा सूरही आळवला. भागवतांनी कुठंही नाव न घेता सत्ताधारी आणि अप्रत्यक्षरित्या मोदींनाही काही थेट संदेश दिल्याचच मत या भाषणानंतर राजकीय विश्लेषकांनी मांडलं.  

हेही वाचा :  India Weather Update : हवामानाबाबत मोठी अपडेट; 'या' राज्यांत पावसाची शक्यता, अधिक जाणून घ्या



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पराभवानंतर पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन? खासदार नव्हे, आमदार होणार; मंत्रीपदही मिळणार?

Pankaja Munde : पराभव होऊनही पंकजा मुंडेंना लॉटरी लागणार आहे. पंकजा मुंडे खासदार नाही तर …

ठाकरेंची नाराजी भोवणार? जयंत पाटलांची विधान परिषदेची वाट खडतर?

Jayant Patil Vidhan Parishad: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान पार पडणार आहे. या …