Maha Samruddhi : पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची चक्क पाठ थोपटली आणि केले कौतुक !

Narendra Modi in Maharashtra : राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) एक आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यानंतर राज्य सरकारच्यावतीने मोदी यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मोदी यांनी मुख्यमंत्री यांची पाठ थोपटली. त्याचवेळी डबल इंजिनचे हे सरकार उत्तम काम करत आहेत, अशी कौतुकाची थापही मारली. आता महाराष्ट्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. महामार्गामुळे विकासाला अन् उद्योगाला चालना मिळेल, असे सांगत मोदी म्हणाले, डबल इंजिनचं सरकार वेगावर काम करतंय.

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे लोकार्पण 

‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’चे (Samruddhi Mahamarg) नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर रेल्वे स्टेशन येथे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांसोबत फ्रिडम पार्क ते खापरीपर्यंत मेट्रो प्रवास केला.आजच्या या विकासकामांमधून डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात वेगाने काम करत असल्याचे दिसत आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबईतील अंतर कमी होईलच, पण २४ जिल्ह्यांना जोडत आहे. यामुळे शेतकरी, भाविक, उद्योगांना मोठा फायदा होईल. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील, असे मोदी म्हणाले. ( अधिक जाणून घ्या –  Narendra Modi समृद्धी महामार्ग अपटेड )

हेही वाचा :  Russia Ukraine War : भारतीयांच्या स्थलांतरासाठी रशियाकडून मानवतावादी मार्ग ; नवनियुक्त रशियन राजदूतांची माहिती; सुरक्षेसाठी दिला निर्वाळा

मोदी यांचा ढोलताशा पथकाशी संवाद 

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या  शानदार सोहळ्यात स्वतः मोदी यांनी ढोलताशा पथकाशी संवाद साधला आणि चक्क ढोलही वाजविला. वायफळ टोलनाकापर्यंत त्यांनी समृद्धी महामार्गावर 10 किलोमीटर राईड  केली. ढोल ताशांच्या गजरात लेझीमच्या निनादात जल्लोषात मोदी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे,भारती पवार, खासदार कृपाल तुमाने, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवारआदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर रेल्वे स्टेशन येथे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. ही सहावी रेल्वे असून नागपूर ते विलासपूर अशी ही रेल्वे धावणार आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सरकारच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय? विजय वडेट्टीवार यांचा सवाल

Vijay Wadettiwar: राज्य सरकारनं क्रिकेटरना दिलेल्या निधीवरून वादंग पेटलंय. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप …

मोठी बातमी! भाजपाचे शिंदे ठाकरे गटात; अंबादास दानवे म्हणाले, ‘महिनाभरात भाजपाचे किती लोक…’

लोकसभा निवडणूक निकालानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. यादरम्यान …