भारतीय नौदलात बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना चांगल्या पगाराची नोकरी

Indian Navy Civilian Recruitment 2023: तुम्ही दहावी उत्तीर्ण असून  चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीच्या शोधात आहात? तर मग तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. 
इंडियन नेव्ही सिव्हिलियन रिक्रूटमेंट 2023 ची घोषणा करण्यात आली आहे.  या भरतीअंतर्गत 910 पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत. यासाठी पदभरतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

इंडियन नेव्ही सिव्हिलियन रिक्रूटमेंट 2023 अंतर्गत चार्जमन, ट्रेडसमन मेट आणि ड्राफ्ट्समन या पदांवर या नियुक्त्या होणार आहेत. भारतीय नौदल नागरी भरती 2023 अंतर्गत ऑनलाइन अर्ज 18 डिसेंबर 2023 पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. 

भरतीचा तपशील

भारतीय नौदलातील नागरी भरती 2023 मध्ये चार्जमनची 42 पदे, वरिष्ठ ड्राफ्ट्समनसाठी 258 पदे आणि ट्रेडसमन मेटसाठी 610 पदे भरण्यत येणार  आहेत.

अर्ज शुल्क

सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांकडून 295 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येणार आहे. तर SC, ST, PWD, महिला आणि माजी सैनिकांकडून अर्ज शुल्क घेण्यात येणा नाही. उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

हेही वाचा :  IRCTC: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रेल्वेच्या आदेशानंतरही मिळत नाहीए 'ही' सुविधा, जाणून घ्या कारण

वयोमर्यादा

चार्जमन आणि ट्रेडसमन मेट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षे इतकी आहे. तर वरिष्ठ ड्राफ्ट्समनसाठी वयोमर्यादा 18 ऐवजी 27 वर्षे ठेवण्यात आली आहे. उमेदवारांच्या वयाची गणना 31 डिसेंबर 2023 हा आधार मानून केली जाईल. असे असले तरी राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही वयात सवलत दिली जाणार आहे. 

शैक्षणिक पात्रता

चार्जमन पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएससी आणि संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी डिप्लोमा केलेला असावा. सिनीअर ड्राफ्ट्समनसाठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी आणि आयटीआय किंवा संबंधित ट्रेडमधील डिप्लोमा उत्तीर्ण झालेले असावेत. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीनंतर केली जाईल याची नोंद घ्या. 

भारतीय नौदलात चार्जमन आणि सिनीअर ड्राफ्ट्समन पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जा. यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा. आता फॉर्म भरा आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा. यानंतर फी भरा आणि फायनल सबमिट वर क्लिक करा. यानंतर भविष्यातील उपयोगासाठी फॉर्मची एक प्रिंट काढून ठेवा.

हेही वाचा :  तहानभूक विसरून मराठ्यांसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे आहेत तरी कोण?

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पराभवानंतर पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन? खासदार नव्हे, आमदार होणार; मंत्रीपदही मिळणार?

Pankaja Munde : पराभव होऊनही पंकजा मुंडेंना लॉटरी लागणार आहे. पंकजा मुंडे खासदार नाही तर …

ठाकरेंची नाराजी भोवणार? जयंत पाटलांची विधान परिषदेची वाट खडतर?

Jayant Patil Vidhan Parishad: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान पार पडणार आहे. या …