घरगुती हिंसाचारावर मात करत झाली IAS अधिकारी! वाचा सविताचा हा प्रेरणादायी प्रवास

UPSC IAS Success Story : सविताच्या पदरात दोन मुलांचे आईपण… त्यात घरगुती हिंसाचाराला बळी असे असूनही तिने युपीएससी परीक्षेत यश मिळवले. तिची ही धाडसाची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी प्रवास आहे.

सविताचा जन्म मध्य प्रदेशातील मंडई गावात एका आदिवासी कुटुंबात झाला. जिथे आर्थिक संघर्षामुळे शिक्षण हे दूरचे स्वप्न वाटत होते. अशा परिस्थितीत तिने उच्च शिक्षण घेतले.. तिला शाळेत असताना मिळालेल्या शिष्यवृत्तीमुळे तिच्या पालकांनी तिला अभ्यास चालू ठेवण्याची परवानगी दिली. तरी देखील तिच्यासमोर अनेक आव्हाने होती…पण या आव्हानांना न जुमानता, तिने दहावी पूर्ण केली. ती दहावी पूर्ण करणारी तिच्या गावातील पहिली मुलगी ठरली.
इयत्ता दहावी पूर्ण केल्यानंतर सविताला सात किलोमीटर दूर असलेल्या महाविद्यालयात जावे लागले… सविताने डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून विज्ञान शाखेचे शिक्षण घेतला.

सविताचे शिक्षण संपत असतानाच एका श्रीमंत कुटुंबातून प्रस्ताव आला. जेव्हा तिच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळाले तेव्हा ती फक्त सोळा वर्षांची होती. लग्न झाल्यानंतर सविताच्या सासरचे लोक तिच्याशी कधीच चांगले वागले नाहीत. तिला जेवणाच्या टेबलावर सगळ्यांसोबत जेवायला परवानगी नव्हती… अनेक वेळा तिचे अन्न संपत असे आणि तिला पुन्हा स्वतःसाठी अन्न तयार करण्याची परवानगीही नव्हती…अनेकदा मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत ​​असे. दोन मुलं होऊनही सासरच्या मंडळींनी तिला मारहाण आणि छळ सुरूच ठेवला होताहा छळ सहन न झाल्याने सविताने एके दिवशी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा :  शेतकऱ्यांच्या पत्नीची उत्तुंग भरारी ; संसारगाडा सांभाळून देखील पोलीस दलात मिळवली PSI पोस्ट!

त्यानंतर सविताने आपले घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या दोन्ही मुलांसह बाहेर पडली. तिने आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एक ब्युटी सलून चालवले.‌ यात आई-वडील आणि भावंडांनी साथ दिली. आता परिस्थिती बदलायची असेल तर शिकायला हवं हे तिने निश्चित केलं. तिने सार्वजनिक प्रशासनात बी.एसाठी प्रवेश घेतला. ती भोपाळच्या बरकतुल्ला विद्यापीठात अव्वल आली. त्यानंतर तिने राज्य नागरी सेवांबद्दल जाणून घेतले आणि त्यासाठी परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात ती यशस्वी झाली. वयाच्या २४व्या वर्षी ती प्रशासकीय अधिकारी झाली. ते ही आय.ए.एस अधिकारी बनली.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुजाता सौनिक यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती ; पहिल्या महिला सचीव

सध्याच्या घडीला महिलांचे विविध क्षेत्रातील अग्रेसर योगदान आणि काम हे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. अशाच सुजाता …

गरिबीवर मात करत सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटीलांच्या अनोख्या कामाचा ठसा…

गडचिरोली आणि चंद्रपूर ह्या भागात काम करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते.‌ त्या ठिकाणी काम …