Baramati Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : मुलगी की सून, बारामतीत कोण मारणार बाजी?

Baramati Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Vote Counting: महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई म्हणून बारामतीकडे पाहिलं जातं. लोकसभा निवडणूक 2024 निकालाचा कौल सुरु झाला आहे. बारामतीत पवार विरुद्ध पवार अशा या सामनाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule)  तर अजित पवार यांच्या राष्ट्रावादीकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) रिंगण्यात आहेत. नणंद – भावजयच्या या लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. 

शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी बारामतीमधील लढत ही प्रतिष्ठेची आहे. गेल्या निवडणुच्या तुलनेत यंदा मतदानात घट झाली असली तरी बारामतीकरांनी 59.50 टक्के मतदान केलं. गेल्या निवडणुकीत 2019 मध्ये भाजपचे राहुल कुल यांची पत्नी कांचन कुल या सुप्रिया सुळेंच्या विरोधात रिंगणात उभा ठाकल्या होत्या. तेव्हा सुप्रिया सुळे यांनी कांचन यांना 1 लाख 30 हजार मतांनी पराभव करुन विजय मिळवला होता. 

तर 2014 मध्ये सुप्रिया सुळे यांनी महादेव जानकर यांचा 69 हजार 666 मताने पराभव केला होता. पण यंदा बारामतीचं चित्र खूप वेगळं होतं. इथे पवार विरुद्ध पवार म्हणजे पवार कुटुंब एकमेकांसमोर उभे ठाकले होते. काका पुतण्याची प्रतिष्ठा आणि नंदन भावजय यांची लढत देशाने पाहिली. अजित पवारांच्या बंडखोरीमुळे बारामतीकर काय कार्यकर्तेही कोणाचा प्रचार करायचा यामुळे संभ्रमात होते. 

हेही वाचा :  खातेवाटप होण्याआधीच राष्ट्रवादीच्या 9 मत्र्यांचे बंगल आणि दालनांचे वाटप; मंत्रीमडंळ विस्तार कधी?

बारामतीमधील ही लढत पवार कुटुंबासाठी जेवढी प्रतिष्ठेची होती तेवढीच राजकीयदृष्ट्या ती महत्त्वाची आहे. त्यामुळे अख्ख पवार कुटुंब प्रचारात उतरलं होतं. कोणी नंनदेच्या पाठीशी उभं होतं तर कोणी सुनेत्रा पवारांसाठी प्रचार करत होते. बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी लढत पाहिला मिळाली. त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांची घड्याळ चालणार की सुप्रिया सुळे यांची तुतारी वाजणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra Weather News : राज्याच्या कोणकोणत्या भागांना पाऊस झोडपणार? कुठे देणार उघडीप?

Maharashtra Weather News : मान्सूनच्या (Monsoon) आगमनानंतर जून महिन्यात हा पाऊस परतणार की दगा देणार? …

‘मला सल्ला देत जाऊ नका, खाली बसा’, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतच दीपेंद्र हुड्डा यांना झापलं, पाहा VIDEO

लोकसभा निवडणुकीनंतर पहिलं अधिवेशन सुरु आहे. दरम्यान अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर एक वेळ अशी …