महाकाय लाटेने तरुणीला समुद्रात ओढून नेलं; प्रियकर मात्र नुसता…; अंगावर काटा आणणारा VIDEO

Viral Video: समुद्राला उधाण आलेलं असताना जवळ जाऊ नका असं आवाहन प्रशासन वारंवार करत असतं. पण तरीही काही हौशी तरुण, तरुणींना समुद्रकिनारी जाऊन लाटांचा आनंद लुटण्याचा मोह आवरता येत नाही. दरम्यान असंच नसतं धाडस करणं एका तरुणीला महागात पडलं असून आपला जीव गमवावा लागला आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, यामध्ये एक महाकाय लाट तरुणीला समुद्रात ओढून नेत असल्याचं दिसत आहे. रशियात ही घटना घडली असून व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल. रिपोर्ट्सनुसार 16 जूनला ही घटना घडली आहे. दरम्यान या व्हायरल व्हिडीओच्या नेमक्या माहितीची पुष्टी झालेली नाही. 

व्हिडीओत जोडपं समुद्रकिनारी चालताना दिसत आहे. यावेळी ते एकमेकांना मिठी मारत, किस करत आपलं प्रेम व्यक्त करत असतात. दुसरीकडे समुद्राला उधाण आलं असून, मोठ्या लाटा उसळत असल्याचं दिसत आहे. पण तरीही दोघे जीव धोक्यात घालून समुद्रात जातात. यावेळी काही लाटांचा ते सामना करतात. पण काही वेळाने एक मोठी लाट येते आणि तरुणीला पाण्यात ओढते. दुसरीकडे प्रियकर किनाऱ्याच्या दिशेने धावत आपला जीव वाचवतो. त्याला प्रेयसी पुन्हा बाहेर फेकली जाईल असं वाटत असतं. पण तसं न होता तरुणी आत समुद्रात बुडू लागते. यानंतर तरुणही हतबलपणे तिचा शोध घेत समुद्रकिनाऱ्यावर पळत राहतो.

हेही वाचा :  VIDEO: ‘...जेव्हा मी वडिलांचे अक्षरशः तुकडे घरी आणले’ हजारोंच्या सभेत प्रियंका झाल्या भावूक, पंतप्रधानांना थेट म्हणाल्या…

एक्सवर Collin Rugg नावाच्या युजरने हा व्हिडीो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे त्यानुसार, तीन दिवसांपासून तरुणीचा शोध घेतला जात असतानाही शोध लागला नाही. 

दुसरीकडे या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं आहे की, ‘हे पाहणं फार दुर्दैवी आहे. तो किती आर्त होऊन तिला शोधत होता हे मी समजू शकतो’. दुसऱ्याने लिहिलं आहे की, “व्हिडीओ सुरू झाला तेव्हा नीट पाहिलं असता तो तिला लाटांमध्ये चालण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं; त्यानंतर दोघांचं नियंत्रण सुटलं. त्याने सुरुवातीपासूनच धोका ओळखला होता”.

“हवाईमध्ये वास्तव केल्याने मी सांगू शकतो की, लहान लाटांच्या शक्तीला कधीही कमी लेखू नका. त्या तुम्हाला पाण्यात खेचतील 10 फूट रुंद असलेली 5 फूट उंच लाट हजारो पौंड वजनाची असते,” असं तिसऱ्या युजरने म्हटलं आहे. “दु:खद. समुद्र निर्दयी आहे, आणि हे त्याच्या सामर्थ्याची आठवण करुन देत असतो,” असं एका युजरने लिहिलं आहे.

हेही वाचा :  Russia Ukraine War Live: युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आज अमेरिकन सिनेटर्सशी बोलणार

59 व्या वर्धापन दिनी शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांचं मोठ विधान. त्यांना केवळ 2 वर्ष झाली आणि 58 वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. त्यांची गद्दार सेना आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

आधार, पॅन, व्होटर आयडी सगळं काही असूनही भारतीय नाही; निवृत्तीनंतर शिक्षकाला समजलं धक्कादायक सत्य

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर :  कागदपत्रे व प्रक्रिया सुरळीत झाल्यास चंद्रपूरच्या 75 वर्षीय गौरीचंद्र …

‘नव्याना संधी मिळायला हवी’, रोहित-कोहलीच्या निवृत्तीवर काय म्हणाले शरद पवार?

Sharad Pawar Reaction ROKO Retirement: टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये साऊथ आफ्रिकेचा दणदणीत …