Vegetable price Hike : गृहिणीचे किचन बजेट बिघडले! पावसाचा जोर ओसरताच पालेभाज्या, फळभाज्या महागल्या

Vegetable price Hike : मान्सूनच आगमन यंदा वेळेत झालं असली तरी पावसाने सध्या दांडी मारलीय. त्यामुळे पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा वाढलाय. त्यात मध्यंतरी मान्सूनपूर्व म्हणजे अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाले होते. अशात पुन्हा एकदा बदलत्या वातावरणाचा फटका हा शेतकऱ्यांसोबत गृहिणीच्या किचन बजेटला बसतोय. कारण पावसाचा जोर ओसरताच पालेभाज्या आणि फळभाज्यांचे भाव वधारले आहेत. कारण मार्केटमध्ये पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक कमी झाली असून सुमारे वीस ते तीस टक्क्यांवर घसरली आहे. (Vegetable Rate Hike)

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक, सिन्नर, दिंडोरी, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर भागातून पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक होते. तर बाजार समितीने खरेदी केलेला शेतमाल हा मुंबईसह, गुजरात अहमदाबादला पाठवण्यात येते. तर त्यातील काही माल हा स्थानिक विक्रीसाठी व्यापारी बाजारातून माल खरेदी करतात. मुळातच बाजार समितीत पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक कमी झाल्यामुळे सर्वांच फटका बसलाय. 

सोमवारी पार पडलेल्या लिलावात फळभाज्या, पालेभाज्यांच्या दरावर एक नजर टाकूयात 

कोथिंबीर (गावठी)

40 रू.झुडी ते 128 रू. झूडी

चायंना

35 रू.झुडी ते 132 रू. झूडी

मेथी

20 रू.झुडी ते 55 रू. झूडी

हेही वाचा :  Maharashtra Weather : मुंबईच्या उच्चांकी तापमानानं चिंता वाढवली; राज्यावर अवकाळीचं सावट

शेपू

25 रू.झुडी ते 61 रू.झूडी

कांदापात

30 रू.झुडी ते 97 रू.झूडी

फळभाज्यांचे दर

 काकडी – 25 रुपये किलो 49 रुपये किलो दर

 गिलके – 55 रुपये प्रति किलो पासून ते 70 रुपये किलो

कारले – 75 रुपये ते 80 रुपये प्रति किलो 

दोडका – 75 ते 85 रुपये प्रति किलो

शिमला मिरची – 65  ते 75 रुपये प्रति किलो

हिरवी मिरची – 75 रुपये ते 90 प्रति किलो रुपये, 

वाल – 80 प्रतिकिलो ते 100 रुपये प्रतिकिलो

गवार – 45 ते 55 रुपये  प्रतिकिलो

घेवडा – 100 ते 125 रूपये प्रतिकिलो

 वांगी – 40 ते 50 रुपये प्रतिकिलो



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सोन्या-चांदीच्या दरात उसळी; 18,22,24 कॅरेटचे आजचे दर जाणून घ्या

Gold Price Today: सोन्याच्या दर आज किचिंत वाढ झाल्याचे चित्र आहे. आज मंगळवारी 2 जुलै …

…म्हणून HDFC च्या खातेधारकांचा Bank Balance दिसणार नाही; का घेतला हा निर्णय?

HDFC Bank UPI Update: देशातील अनेक विश्वासार्ह आणि बड्या खासगी बँकांपैकी एक असणारं नाव म्हणजे …