बाबो, इतका पैसा! ‘या’ 5 उद्योगपतींनी रोज 8 कोटी खर्च केले तरी संपायला 500 वर्ष लागतील

Top 5 Richest Man in the World : जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी दरवर्षी जाहीर केली जाते. या यादीनुसार गेल्या चार वर्षात श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत रॉकेटच्या वेगाने वाढ झाली आहे. अमेरिकेतल्या ऑक्सफॅम इंटरनॅशनल संस्थेने दिलेल्या अहवालानुसार 2020 पासून आतापर्यंत जगातील पाच अरबपतींच्या संपत्तीत तब्बल 114 टक्के वाढ झाली आहे. 

 

कोविड महामारीनंतर संपत्तीत वाढ

 2020 नंतर जगाने खूप चढ-उतार पाहिले. कोविड महामारीपासून युक्रेन-रशिया युद्ध, इस्त्रायल-हमास युद्ध, या घटनांनी जगाच्या अर्थव्यवस्थेला (Economy) मोठा फटका बसला. अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. जी काही बचत केली होती ती संपली. मोठमोठ्या कंपन्या बंद झाल्या. याचा परिणाम असा झाला गरीब आणखी गरीब झाले तर श्रीमंत गडगंज श्रीमंत झाले. 2020 पासून आतापर्यंत जगातील पाच श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली. 

 

‘या’ पाच श्रीमंती संपत्ती वाढली

ऑक्सफॅम इंटरनॅशनल संस्थेच्या अहवालानुसार (Oxfam Ineqality Report) ज्या अरबपतींची संपत्ती वाढली आहे, त्यात एलन मस्क (Elon Musk), बर्नाड अनॉल्ट (Bernard Arnault), जेफ बेजोस (Jeff Bezos), लॅरी एलिसन (Larry Ellison) आणि मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) या उद्योगपतींचा समावेश आहे.  या अरबपतींची संपत्ती तब्बल 114 टक्क्यांनी वाढली आहे. 

हेही वाचा :  काकाचा मोबाईल हॅक करुन फोटो, व्हिडीओ पाहिले अन् नंतर... पुतण्याचं धक्कादायक कृत्य

 

प्रत्येक तासाला 116 कोटी

ऑक्सफॅम इंटरनॅशनल संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या पाच उद्योगपतींची संपत्ती 2020 नंतर 405 अरब अमेरिकी डॉलरवरुन 869 अरब अमेरिकी डॉलर म्हणजे भारतीय रुपयात 72 लाख करोड रुपये इतकी वाढली आहे. हे अरबरपती प्रत्येक तासाला 1.4 डॉलर म्हणजे 116 कोटी रुपयांहून अधिकची कमाई करतायत. श्रीमंतांच्या संपत्तीच्या वाढीचा वेग असाच राहिला तर पुढच्या 10 वर्षात जगात खरबपती तयार होतील. जगातील 148 कंपन्यांनी 1800 अरब अमेरिकी डॉलरचा नफा कमावला. जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या 1 टक्का लोकांकडे तब्बल 43 टक्के संपत्ती आहे. 

 

कोणाची किती संपत्ती?

फोर्ब्स बिलेनिअर्स यादीनुसार टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत, 

 

एलन मस्क – 230 अरब

बर्नार्ड अनॉल्ट – 182 अरब  

जेफ बेजोस  – 176 अरब  

लॅरी एलिसन- 135 अरब 

मार्क झुकरबर्ग – 132 अरब  

 

श्रीमंत-गरीब दरी वाढली

अहवालानुसार पाच अरब लोकं गरीबीत जगतायेत. गरीबीच्या वाढत्या आलेखानुसार पुढच्या 229 वर्षातही जगातील गरीबी संपणार नाही. ऑक्सफॅम इंटरनॅशनल संस्थेच्या अहवालानुसार कॉर्पोरेट क्षेत्रामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. श्रीमंतांना टॅक्समध्ये मोठी सुट मिळतेय. तर कामगारांना गरीबीच्या खाईत लोटलं जातंय. खासगीकरणामुळे कामगारवर्ग पिचला गेल्याचं या अहवालात नमुद करण्यात आलंय. 

हेही वाचा :  RBI Monetary Policy: RBI कडून कर्जदारांना दिलासा मिळणार? जाणून घ्या कधी होईल EMI स्वस्त...



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लोणावळा दुर्घटनेनंतर आता भीमाशंकर वनविभागाचा मोठा निर्णय; ‘या’ पर्यटनस्थळांवर बंदी

Lonavala Bhushi Dam Accident: मान्सून सुरू झाला आहे. अशावेळी पर्यटकांची पावलं आपसूकच निसर्गरम्य पर्यटनस्थळांकडे वळतात. …

बर्थ-डे पार्टीत दारू कमी दिली, चिडलेल्या तरुणाने मित्राला चौथ्या मजल्यावरुन फेकले अन्…

Ulhasnagar Crime News: देशात गुन्हेगारीचा आलेख वाढल्याचे चित्र आहे. क्षुल्लक कारणावरुन जवळच्याच लोकांकडून दिवसाढवळ्या हत्या …