रिक्षाचालकाचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात बनला IAS, संघर्षाची कहाणी ऐकून येईल डोळ्यात पाणी

IAS Ansar Shaikh Success Story: माणसाने आयुष्यात काही करण्याचा निश्चय केला तर त्याला कोणीही रोखू शकत नाही. यशस्वी झालेल्या अनेकांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला संघर्ष पाहिलाय. पण त्यावर त्यांनी मात केली आणि आपलं वेगळेपण सिद्ध केलं. यूपीएससी उत्तीर्ण होऊन आयएएस, आयपीएस बनणाऱ्यांच्या अनेकांच्या कहाण्या अशाच संघर्षाच्या असतात. आज आपण अशाच एका अधिकाऱ्याची गोष्ट जाणून घेणार आहोत.

अन्सार शेख हे खडतर परिस्थितीवर मात करत आयएएस बनले.  त्यांचे वडील ऑटो चालवायचे. घरची परिस्थिती तशी बेताचीच. पण आपण आयुष्यात वेगळ काहीतरी करायचं हे स्वप्न अन्सार त्यांनी मनाशी ठरवलं होते. यासाठी ते लहान वयापासूनच प्रेरित होते. शिस्तीला त्यांनी आपल्या आयुष्याचा एक भाग बनवलं होतं. याचीच प्रचिती म्हणून वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी ते यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करु शकले.  

कमी वयात यूपीएससी उत्तीर्ण करणाऱ्यांच्या यादीत अन्सार शेख यांचे नाव घेतले जाते. अन्सार शेख हे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील ऑटोरिक्षा चालवतात. अन्सार यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. पण असे असतानाही त्यांनी अभ्यासावरचे लक्ष ढळू दिले नाही. त्यांनी यूपीएससीची परीक्षेवर लक्ष केंद्रीत केलं. त्यासाठी अफाट मेहनत घेतली. 

हेही वाचा :  VIDEO : थोरल्या जावेनं चिमुकल्या पुतण्याला पाजलं विष, हृदय पिळवटून टाकणारी घटना CCTV त कैद

अन्सार शेख सुरुवातीपासूनच खूप हुशार होते. त्यांना दहावी आणि बारावीत चांगले गुण मिळाले होते. अन्सार यांनी आपले पदवीचे शिक्षण पुण्यातून पूर्ण केले. यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी 3 वर्षे स्वत:ला झोकून दिले. या 36 महिन्यात त्यांनी दररोज सुमारे 12 तास मेहनत घेतली. 

आपल्या मेहनतीला जोड म्हणून कोचिंग क्लासची मदत घेणे त्यांना गरजेचे वाटत होते. पण कोचिंग क्लासची फी भरु इतकी त्यांची परिस्थिती नव्हती. पण एका कोचिंग क्लासने त्यांची बाजू समजून घेतली आणि फीमध्ये अन्सार यांना सवलत दिली. 

 21व्या वर्षी यूपीएससी 

वयाच्या विशीत मुले मजा मस्ती करण्यावर भर देतात. पण अन्सार यांनी वयाच्या 21व्या वर्षी यूपीएससी परीक्षा दिली. एवढेच 361 वा क्रमांक मिळवला. अन्सार शेख हे देशातील सर्वात तरुण आयएएस अधिकारी ठरले. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी कामगिरी केली. अन्सारी यांनी आपल्या अनुभवांवर ‘यूपीएससी, मी आणि तुम्ही’ हे पुस्तकही लिहिले आहे. 

दिवसाचे 12 ते 14 तास अभ्यास

अन्सार शेख यांनी यूपीएसी क्रॅक करण्यासाठी एक खास रणनीती आखली आहे. अन्सार दिवसातून किमान 12 ते 14 तास अभ्यास करायचे. अन्सार शेख यांच्या घरात शिक्षणाचे वातावरण नव्हते. त्यांच्या बहिणींचे लहान वयातच लग्न झाले. आयएएस झाल्यानंतर त्यांनी वैजा अन्सारीसोबत लग्न केले. अन्सार आणि त्यांची पत्नी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.

हेही वाचा :  Nagpur news : 2500 वर्षांपूर्वीच्या महापाषाण संस्कृतीचे पुरावशेष जगासमोर; पाहा नेमकं कायकाय सापडलं...



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? राज्यात पेटलं राजकारण!

Shiv Jayanti: शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? हा वाद वर्षानुवर्ष सुरु आहे. आता सरकारने …

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा घेता येणार? अर्ज कुठे आणि कसा भरायचा? जाणून घ्या सर्व काही

Seema Adhye, Zee 24 Taas : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे फडणवीस सरकारने आज आपला अर्थसंकल्प …