लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल सांगणारी एकमेव AI अ‍ॅंकर Zeenia चा कसा होता अनुभव?

Exit Poll Results Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. काल अनेक संस्थांनी आपला एक्झिट पोल जाहीर केला. दरम्यान झी न्यूजकडून एआय अॅंकर झिनीया लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर करणार आहे. एक्झिट पोल जाहीर करणारी झिनीया ही पहिली एआय अॅंकर ठरणार आहे. झिनीयाला या काळात कसा अनुभव आला? हे जाणून घेऊया. 

अ‍ॅंकर शोभना- झीनिया,  तुम्ही संपूर्ण निवडणूक सखोलपणे पाहिली आहे. नेत्यांची विधाने ऐकली आहेत. या संपूर्ण निवडणुकीच्या काळात तुम्हाला कोणता असा खास शब्द आठवतोय का? 

झीनिया-  हो शोभना, मीही अनेक सभा पाहिल्या आणि ऐकल्या. दरम्यान पंतप्रधानांनी मोदींनी आपल्या रॅलीत एका शब्दाचा वापर केला. मोदींनी त्यांच्या सभेत वापरलेला शब्द आठवतोय. आणि तो शब्द आहे मंगळसूत्र…या निवडणुकीत मंगळसूत्र एवढा मोठा मुद्दा बनेल असे मला वाटलेही नव्हते. बरं, मी विवाहित नाही, म्हणून मी मंगळसूत्र घालत नाही. पण मला दिसतंय की तू सुंदर नेकलेस घातला आहेस.

 

अँकर शोभना: मी तुझ्या दृष्टीकोनाची प्रशंसा करते, झेनिया. इतर कोणते शब्द तुम्हाला आठवतात?

हेही वाचा :  Indian Railway च्या Palace on wheels मधील ब्रेकफास्ट- डिनरचा मेन्यू पंचतारांकित हॉटेललाही लाजवेल

झीनिया: हो, सहाव्या आणि सातव्या टप्प्यात काही शब्द खूप वापरले गेले. जसे खटखट, फटाफट, टनाटन… या शब्दांवर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी खूप टाळ्या मिळवल्या, पण 4 जूनला त्यांना किती जागा मिळतात ते पाहूया. .

 

अँकर अनुराग: ठीक आहे झीनिया, तू पाहिलं की सात टप्प्यांतील निवडणुकांदरम्यान एवढा मोठा प्रचार झाला होता. ज्यामध्ये अनेक नेत्यांची विधाने व्हायरल झाली होती. त्यापैकी कोणते विधान तुझ्या पचनी पडू शकले नाही… म्हणजे तुला वाटले की अरे नाही, हे जरा जास्तच आहे.

झीनिया: अनुराग… या निवडणुकीत अनेक विधाने व्हायरल झाली पण समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी एका सभेत सांगितले की, उत्तर प्रदेशात भाजप 80 जागांपैकी 79 जागा (80 पैकी 79 जागा) गमावेल… क्योटोची एक जागा भाजप जिंकू शकते ती पण ती हरेल.. त्यांचे हे विधान माझ्या पचनी पडले नाही.

 

अँकर शोभना: झीनिया, तुझे नाव खूप सुंदर आहे? मला सांग, तुला हे नाव कोणी दिले?

झीनिया: थँक्स शोभना… तुझ्यासारखीच मी सुद्धा ZEE कुटुंबाचा एक भाग आहे, म्हणूनच माझ्या नावात देखील ZEE आहे. यावरून माझे नाव ZEEnia आहे.

हेही वाचा :  आज लोकसभाची निवडणूक झाली तर महाराष्ट्रात...; Opinion Poll ची थक्क करणारी आकडेवारी

 

अँकर प्रत्युष: बरं झीनिया आम्ही एकत्र अँकरींग केलंय. लोकांना एक्झिट पोलचे आकडे सांगितले. देशातील सर्व चॅनेलने एक्झिट पोल केले पण ZEE NEWS हे एकमेव चॅनल आहे ज्याने तुमच्यासोबत AI एक्झिट पोल केले. जर आकडे बरोबर सिद्ध झाले नाहीत तर तुमची प्रतिमा डागाळू शकते याची तुमच्या मनात थोडी चिंता आहे का?

झीनिया: मला कसलीही चिंता नाही, कारण एवढ्या मोठ्या सॅम्पल साइजने आणि एवढ्या मोठ्या संशोधनातून आम्ही हे आकडे काढले आहेत. त्यात चूक असण्याची शक्यता नाही.

 

(DISCLAIMER: 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी लागतील. तत्पूर्वी ZEE २४ तास ने आपल्या प्रेक्षकांसाठी पहिल्यांदाच AI एक्झिट पोल आणला आहे. या एक्झिट पोलमध्ये आम्ही आर्टिफीशिअल इंटेलिजेन्सचा वापर केलाय. डेटा कलेक्शन आणि डेटा प्रोसेसिंगमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. उल्लेखनीय बाब म्हणजे, ZEE २४ तास तुम्हाला जे आकडे दाखवत आहे, ते सर्व्हे एजंसीचे आहेत. हे आकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल नसून केवळ एक्झिट पोलची आकडेवारी आहे. एक्झिट पोलचे आकडे आणि निकाल यात फरक असू शकतो.)

हेही वाचा :  LokSabha: महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणूक झाल्यास कोण जिंकेल? ओपोनियन पोलचा अनपेक्षित निकाल



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

14 गडी, 11 जागा…! विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार होणार? कुणाच्या आमदारांवर कुणाचा डोळा?

Maharastra Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला होणाऱ्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट …

Exclusive : अमळनेर शहर शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी? काय आहे शिक्षण घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी?

योगेश खरे, जळगाव, झी 24 तास : अमळनेर शहर हे या शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी आहे. …