‘पुलवामा’संदर्भातील ‘ते’ विधान प्रणिती शिंदेंना भोवणार? थेट निवडणूक आयोगाने घेतली दखल

Praniti Shinde On Pulwama Attack: सोलापूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार तसेच माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेंच्या कन्या प्रिणिती शिंदेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयुक्तांकडे प्रणिती शिंदेंविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. प्रणिती शिंदेंनी जाहीर भाषणामध्ये केलेल्या एका विधानाविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली असून प्रणिती शिंदेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपाने केली आहे.

भाजपाने काय म्हटलं आहे?

प्रणिती शिंदेंनी विरोधकांवर टीका करताना 2019 साली पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत गंभीर दावे केले होते. पुलवामाचा हल्ला हा घडवून आणल्याचा दावा प्रणिती शिंदेंनी जाहीर भाषणात केला. यासंदर्भातील दावे सरकारमधील अधिकाऱ्यांनी केल्याचा संदर्भ त्यांनी दिला. याच विधानावर आता भाजपाने आक्षेप घेतला आहे. प्राणिती शिंदेंनी पुलवामा हल्ल्याप्रकरणी केलेलं वक्तव्य हे देशाची बदनामी करणारं होतं, असं भारतीय जनता पार्टीने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> महत्त्वाची बातमी! निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या; पाहा नवं वेळापत्रक

प्रणिती शिंदे काय म्हणाल्या होत्या?

प्रणिती शिंदेंनी एका जाहीर भाषणामध्ये पुलावामाचा उल्लेख करत सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला होता. “जेव्हा त्यांना कळतं की आपली बाजू कमी आहे त्यांची जास्त आहे. लास्टमध्ये त्यांना काही मिळालं नाही तर जातीमध्ये तेढ निर्माण करतात. सावधा राहा!” असं प्रणिती शिंदे या भाषणा म्हणाल्या. पुढे त्यांनी पुलवामाचा उल्लेख करताना 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस हा हल्ला घडवून आणल्याचा दावा अधिकारीच करतात असं म्हटलं. “मागच्यावेळेसही पुलवामा घडवलं. त्यांचे अधिकारी म्हणाले घडवलं घडलं नाही. कसं घडवलं? आपल्या जवानांच्या रक्तामधून… वा… एवढ्या खालच्या पातळीला जाऊ शकतात. यातूनच त्यांची मानसिकता कळते,” असं प्रणिती म्हणाल्या होत्या. याच विधानाविरोधात निवडणूक आयुक्तांकडे भाजपाने तक्रार नोंदवली आहे.

हेही वाचा :  शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, निर्देश देत न्यायालयाकडून यंत्रणांना खडे बोल

नक्की वाचा >> ‘राज ठाकरे भाजपचे नवे डार्लिंग बनले, पण..’, राऊतांचा टोला; म्हणाले, ‘राणे जेवढे..’

पुलवामामध्ये काय घडलं होतं?

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या काही महिनेआधी म्हणजेच 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे भारतीय लष्करी जवानांच्या बसवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. हा हल्ला जैश-ए-मोहम्मदने घडवून आणल्याचं सांगण्यात आलं. या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांचं आत्मघाती वाहन जवानांच्या बसला धडल्याने मोठा स्फोट झाला होता. या वाहनामध्ये 100 किलो आरडीएक्स होतं अशी माहिती नंतर समोर आली.

नक्की वाचा >> ‘मोदी-शहांचे नाव घेतले तरी महाराष्ट्रात लोक चिडतात’, राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, ‘केलेल्या पापकर्मांची..’

लंकेविरुद्धही तक्रार

अहमदनगरमध्ये भाजपाच्या सुजय विखे-पाटील यांच्याविरोधात उभ्या असलेल्या निलेश लंके यांच्याविरोधातही भाजपाने तक्रार दाखल केली आहे. अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार गटाकडून उमेदवार म्हणून अहमदनगरमधून लढणाऱ्या लंके यांच्या एका पोस्टवर भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेचा फोटो वापरल्याप्रकरणी भाजपाने आक्षेप घेत लंकेंविरुद्ध निवडणूक आयुक्तांकडे तक्रार नोंदवली आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बर्थ-डे पार्टीत दारू कमी दिली, चिडलेल्या तरुणाने मित्राला चौथ्या मजल्यावरुन फेकले अन्…

Ulhasnagar Crime News: देशात गुन्हेगारीचा आलेख वाढल्याचे चित्र आहे. क्षुल्लक कारणावरुन जवळच्याच लोकांकडून दिवसाढवळ्या हत्या …

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात; विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी काही कळेना

Shivsena Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात सापडले आहेत.  विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी …