बारावीच्या निकालाचा टक्का घसरला; 17 महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेचा निकाल शून्य टक्के

Maharashtra Board 12th Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्य मंडळाने जाहीर केलेल्या निकाला निकालानुसार यंदा बारावीचा निकाल (HSC Result) 91.25 टक्के लागला आहे. यंदा देखील या बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली असून मुलींचा निकाल हा 93.73 टाके लागला आहे. तर मुलांचा निकाल हा 89.14 टक्के लागला आहे. नऊ विभागांमध्ये यंदा देखील कोकण विभागाने अव्वल क्रमांक पटकावला असून या विभागाचा निकाल 96.01 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा (Mumbai) असून तो 88.13 टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली आहे.

बारावीच्या परीक्षेत यंदा 14 लाख 28 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी यंदा झाली होती. राज्याचा निकाल 91.25 टक्के इतका लागला असून 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा हा निकाल कमी लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बारावीचा निकाल 2.97 टक्क्यांनी घटला आहे. तर दुसरीकडे मुंबई विभागाचा निकाल देखील घसरला आहे. मुंबई विभागाचा निकाल 88.13 टक्के लागला असून इतर विभागांमध्ये हा सर्वात कमी निकाल आहे.

हेही वाचा :  'मी मुर्खांना...'; संजय राऊतांबद्दलचा 'तो' प्रश्न ऐकताच फडणवीसांचं रोखठोक उत्तर

17 महाविद्यालयांचा शून्य टक्के निकाल

धक्कादायक बाब म्हणजे राज्यातील 17 महाविद्यालयांमध्ये एकही विद्यार्थी पास झालेला नाही. या महाविद्यालयांच्या विज्ञान शाखेतील एकही विद्यार्थी उत्तीर्ण न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागांचा निकाला दुपारी 2 वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे. यंदा 154 विषयासाठी इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आल्या होत्या. विभागीय मंडळाचा निकाल पहिला तर यात पुणे विभागाचा निकाल हा 93.34 टक्के लागला आहे. नागपूर विभागाचा निकाल हा 90.35 टक्के,औरंगाबाद विभागाचा निकाल हा 91.85 टक्के लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल हा 88.13 टक्के लागला आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल हा 93.28 टक्के, अमरावती विभागाचा निकाल 92.75, नाशिक विभागाचा निकाल 91.66 टक्के लागला आहे. तर लातूर विभागाचा निकाल हा 90.37 टक्के लागला आहे आणि कोकण विभागच निकाल हा 96.01 टक्के लागला आहे.राज्यातील एकूण निकाल हा 91.25 टक्के लागला आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मला सल्ला देत जाऊ नका, खाली बसा’, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतच दीपेंद्र हुड्डा यांना झापलं, पाहा VIDEO

लोकसभा निवडणुकीनंतर पहिलं अधिवेशन सुरु आहे. दरम्यान अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर एक वेळ अशी …

वहिणीशी समलैंगिक संबंध, आई आणि भावाला संपवलं… ‘त्या’ एका गोष्टीने दुहेरी हत्याकांडाचा झाला उलगडा

23 जून 2024 मध्ये हरियाणातलं आझाद नगर दुहेरी हत्याकांडाने हादरलं. इथल्या एका घरात आई आणि …