10 फुटांची मगर कुंपणावर चढू लागली अन्..; भारतातील ‘या’ शहरामधला थरार कॅमेरात कैद

10 Foot Crocodile Video From Indian City: वरील फोटोत दिसणारं दुष्य हे एखाद्या चित्रपटामधील किंवा अगदी अमेरिका, ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेसारख्या वन्यप्राण्यांची संख्या अधिक असलेल्या देशातील नसून भारतामधील आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. मात्र हे सत्य आहे. हा फोटो उत्तर प्रदेशमधील बुंदेलशहरमधील आहे. बुधवारी सकाळी बुदेलशहमधील हे दृष्य पाहून अनेकांना मोठा धक्का बसला. पाहता पाहता हा व्हिडीओ शहरभर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. 

कुठे घडला हा प्रकार?

झालं असं की, गंगा नदीच्या पात्रातून एक मगर चुकून रहदारीच्या नरौरा गंगाघाटजवळील रस्त्यावरील फुटपाथवर आली. आता ही मगर कशी आणि आणि कुठून आली यासंदर्भातील नेमकी माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र आपण वाट चुकल्याचं लक्षात आल्यानंतर मगरीने पुन्हा नदीपात्रात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र मध्ये काही फूट उंचीचे लोखंडी कुंपण होतं. त्यामुळेच या 10 फुटाच्या मगरीने चक्क या कुंपणावर चढण्याचा प्रयत्न केला. शेपटीच्या आधाराने कुंपणावर चढण्याचा हा मगरीचा प्रयत्न पाहून आजूबाजूला असलेले लोक घाबरलेच. 

हेही वाचा :  रश्मी वहिनी मंडपात शिरताच कुलर-पंखे बंद, टेंभी नाका देवीच्या दर्शनावेळी ठाण्यात काय घडलं?

कॅमेरात कैद केला थरार

या मगरीने कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न अपयशी ठरला आणि मगर पुन्हा फुटपाथवर पडली. वजन जास्त असल्याने आणि कुंपणाची उंची अधिक असल्याने मगरीला कुंपण ओलांडता आलं नाही पडल्यानंतर ही मगर पुढल्या बाजूला चालू लागली. या कुंपणाला ओलांडण्यासाठी इतर काही मार्ग आहे का याचा ती शोध घेता पुढे चालू लागली. हा सारा प्रकार रस्त्यावरुन जाणाऱ्यांनी मोबाइल कॅमेरात कैद केला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

1)

2)

मगर भेटीचा शेवट कसा झाला?

लोखंडी कुंपण ओलांडण्याच्या प्रयत्नात ही मगर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ‘लाइव्ह हिंदुस्तान’ने दिलेल्या वृत्तानुसार, या मगरीला पुन्हा पाण्यात सोडण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं. या वन कर्मचाऱ्यांनी मगरीला पकडून पांढऱ्या कापडात गुंडाळून पुन्हा पाण्यात नेऊन सोडलं. मात्र या मगरीच्या भेटीने शहरभर हाच विषय चर्चेत होता, हे मात्र खरं.

हेही वाचा :  Video: फ्रेंच फ्राइजवर सुकवलं लादी पुसायचं कापड! McDonald's मधला किळसवाणा प्रकार



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मला सल्ला देत जाऊ नका, खाली बसा’, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतच दीपेंद्र हुड्डा यांना झापलं, पाहा VIDEO

लोकसभा निवडणुकीनंतर पहिलं अधिवेशन सुरु आहे. दरम्यान अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर एक वेळ अशी …

वहिणीशी समलैंगिक संबंध, आई आणि भावाला संपवलं… ‘त्या’ एका गोष्टीने दुहेरी हत्याकांडाचा झाला उलगडा

23 जून 2024 मध्ये हरियाणातलं आझाद नगर दुहेरी हत्याकांडाने हादरलं. इथल्या एका घरात आई आणि …