लखनौचा कर्णधार केएल राहुल चमकला, हैदराबादसमोर 170 धावांचं लक्ष्य

लखनौचा कर्णधार केएल राहुल चमकला, हैदराबादसमोर 170 धावांचं लक्ष्य

SRH Vs LSG, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 12 व्या सामन्यात हैदराबादनं लखनौसमोर 170 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून हैदराबादच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या लखनौच्या संघानं हैदराबादच्या संघानं 20 षटकात 7 विकेट्स गमावून 169 धावा केल्या. या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलनं चमकदार कामगिरी केली. आजच्या सामन्यात कोणाता संघ बाजी मारणार? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

नाणेफेक गमवाल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या लखनौच्या संघाची सुरुवात खराब झाली. लखनौचा सलामीवीर क्विंटन डी कॉक एक धाव करून बाद झाला. त्यानंतर एविन लुईसही स्वस्तात माघारी परतला. मात्र, कर्णधार केएल राहुलनं एक बाजूनं संघाचा डाव सावरला. मनिष पाडे आणि आयुष बदोनी यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा केली जात होती. परंतु, दोघेही अपयशी ठरले. हे दोघे बाद झाल्यानंतर दिपक हुड्डा आणि केएल राहुलनं संघाचा डाव पुढे नेला. मात्र, पंधराव्या षटकातील पहिल्याच चेंडूमध्ये शेफर्डनं हुड्डाला माघारी धाडलं. त्यानंतर 18 व्या षटकात केएल राहुलनं आपली विकेट्स गमावली. त्यानं 50 चेंडूत 68 धावांची उत्कृष्ट खेळी केली. ज्यामुळं लखनौच्या संघाला 20 षटकात 7 विकेट्स गमावून 169 धावापर्यंत मजल मारता आली. हैदराबादकडून वॉशिंग्टन सुंदर, शेफर्ड आणि टी नटराजन यांना प्रत्येकी दोन- दोन विकेट्स मिळाली.

हैदराबादचा संघ-
केन विल्यमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (विकेटकीपर), अब्दुल समद, रोमॅरियो शेफर्ड, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक.

लखनौचा संघ-
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मनीष पांडे, एविन लुईस, दीपक हुडा, आयुष बडोनी, क्रुणाल पांड्या, जेसन होल्डर, अँड्र्यू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान.

हे देखील वाचा-

IPL 2022: पंजाब किंग्सचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू रोहित शर्माचा मोठा फॅन

IPL 2022: क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का! आयपीएल सुरु असताना ‘या’ धाकड फलंदाजानं घेतला निवृत्तीचा निर्णय

Who is Vaibhav Arora: कोण आहे वैभव अरोरा? त्याच्यासमोर चेन्नईच्या फलंदाजांनी टेकले गुडघे

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha
[yt]https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA[/yt]

हेही वाचा :  'तू चाहत्यांसाठी जे काही केलं...' विराटची रोनाल्डोसाठी स्पेशल पोस्ट

Source link