IPL 2022, GT vs LSG Match Live Update : गुजरात आणि लखनौ यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : गुजरात आणि लखनौ यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स


IPL 2022, GT vs LSG Match Live Update : आयपीएलच्या 15 हंगामात 8 जागी 10 संघ सामिल झाले आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स (GT vs LSG) या दोन संघाच्या एन्ट्रीमुळे आता स्पर्धा आणखी चुरशीची होणार हे नक्की. दरम्यान या नव्याने सामिल झालेल्या दोन्ही संघामध्ये आज लढत असणार असून पहिल्यांदाच हे दोन्ही संघ आयपीएलच्या मैदानात उतरणार आहेत. यावेळी हार्दीक पंड्या गुजरातचं तर राहुल लखनौचं कर्णधारपद सांभाळणार आहे.

गुजरात आणि लखनौ संघाचा विचार करता या दोन्ही संघानी यंदा पहिल्यांदाच स्पर्धेत सहभाग घेतला असला तरी दोन्ही संघातील खेळाडू मात्र कमालीचे अनुभवी आहेत. लखनौचा कर्णधार राहुलला याआधी पंजाब संघाचं नेतृत्त्व करण्याचा अनुभव देखील आहे. तर दुसरीकडे हार्दीक पहिल्यांदाच कर्णधार म्हणून आयपीएलच्या मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघाकडे गोलंदाजीमध्येही बरेच पर्याय असल्याने सामना चुरशीचा होणार हे नक्की.

असा आहे गुजरातचा संघ –
हार्दिक पंड्या (15 कोटी), राशिद खान (15 कोटी) शुभमन गिल (8 कोटी), मोहम्मद शमी (6.25 कोटी), जेसन रॉय (2 कोटी), लॉकी फर्ग्युसन (10 कोटी), अभिनव सदरंगानी (2.6 कोटी), राहुल तेवातिया (9 कोटी), नूर अहमद (30 लाख), साई किशोर (3 कोटी), डॉमनिक ड्रेक्स (1.10 कोटी), जयंत यादव (1.70 कोटी), विजय शंकर (1.40 कोटी), दर्शन नालकंडे (20 लाख), यश दयाल (3.20 कोटी), अल्झारी जोसेफ (2.40 कोटी), प्रदीप सांगवान (20 लाख), मॅथ्यू वेड (2.40 कोटी), वृद्धिमान साहा – (1.90 कोटी), डेविड मिलर – ( 3 कोटी),  वरुण अरॉन- 50 (लाख रुपये), गुरकीरत मान सिंह- (50 लाख रुपये), नूर अहमद – (30 लाख रुपये), साईं सुदर्शन- 20 लाख रुपये

हेही वाचा :  Sania Mirza : कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यात सानिया पराभूत, भावूक होत टेनिसला अलविदा

कसा आहे लखनौ संघ ? –
केएल राहुल (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, रवी बिश्नोई, क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, जेसन होल्डर, दीपक हुडा, क्रुणाल पांड्या, आवेश खान, अंकित राजपूत, कृष्णप्पा गौतम, दुष्मंता चमीरा, शाहबाज नदीम, मनन वोहरा, मनन खान, आयुष बधोनी, काइल मायर्स, कर्ण शर्मा, एविन लुईस, मयंक यादव आणि बी साई सुदर्शन.

Source link