नोकरीसोबत शिक्षणही पूर्ण करायचंय? मुंबई विद्यापीठातील अभ्यासक्रमांसाठी ‘असा’ करा अर्ज

नोकरीसोबत शिक्षणही पूर्ण करायचंय? मुंबई विद्यापीठातील अभ्यासक्रमांसाठी ‘असा’ करा अर्ज


Mumbai University Course: नोकरीला लागल्यावर अनेक तरुणांचे पुढे शिक्षण घेण्याचे स्वप्न अपूर्ण राहते. पण अशा विद्यार्थ्यांना नोकरीसोबतच शिक्षण घेण्याची संधी मुंबई विद्यापीठाकडून मिळते. मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रात विद्यार्थीपयोगी विविध अभ्यासक्रमांसाठी तुम्ही प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण करु शकता. येथे प्रथम वर्षाचे अभ्यासक्रमांचे प्रवेश 26 जूनपासून सुरु होत आहेत. ही प्रवेशप्रक्रिया 31 जुलैपर्यंत सुरु राहील. मागील वर्षी पदवी अभ्यासक्रमामध्ये 9819 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. 

पदवीस्तरावरील प्रथम वर्ष बी.ए., बी.कॉम., बी.कॉम.(अकाऊंटिंग अँड फायनान्स),              बी.एससी  (माहिती तंत्रज्ञान),बी. एससी. (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरु झाले आहेत.  व्दितीय व तृतीय वर्ष : बी.ए., बी.कॉम., बी.कॉम.(अकाऊंटिंग अँड फायनान्स), बी.एससी(माहिती तंत्रज्ञान), बी.एससी.(संगणकशास्त्र), एम. ए.(इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी), एम. ए. (भूगोल), एम. ए. (शिक्षणशास्त्र), एम. ए. (मानसशास्त्र), एम. ए. (संज्ञापन आणि पत्रकारिता),एम. ए. (जनसंपर्क),एम. कॉम.(अकाउंट्स),एम.कॉम. (व्यवस्थापन), एमएमएस, एम.एस. सी. (गणित), एम. एस. सी. (माहिती तंत्रज्ञान), एम. एस. सी. (संगणकशास्त्र), एमसीए व प्रथम व द्वितीय वर्ष एमएमएस आणि एमसीए प्रथम व द्वितीय वर्ष या अभ्यासक्रमांचे प्रवेश लवकरच सुरु करण्यात येतील. 

हेही वाचा :  एक कोटी ६४ लाख नागरिकांची दुसऱ्या मात्रेकडे पाठ; राज्यातील स्थिती, लसीकरण पूर्ण करणे आवश्यक

पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची सुरुवात एनईपी (राष्ट्रीय शैक्षणिक धोरण) नुसार सीडीओईमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रथम वर्षाचे प्रवेश एनईपीनुसार लवकरच सुरु करण्यात येतील. हे प्रवेश ऑनलाईन असून विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning या वेबसाइटवर अधिक माहिती देण्यात आली आहे.

सीडीओईचे चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी आणि सावंतवाडी येथे विभागीय केंद्रे असून या ठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन आणि अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे.  पालघर येथेही लवकरच विभागीय केंद्र सुरु होणार आहे.  ज्या विद्यार्थ्यांना नियमित महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही किंवा ज्यांचे शिक्षण अपूर्ण राहिले आहे. त्यांच्यासाठी दूरस्थ शिक्षण प्रणाली हा एक योग्य पर्याय आहे.  यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा असे आवाहन सीडीओईचे प्रभारी संचालक डॉ. संतोष राठोड यांनी केले आहे.

पुढील अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरु

शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये प्रथम वर्षात पुढील अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरु झाले आहेत.बीएचे 3926, बी.कॉमचे 4987, बी.कॉम – अकाउंटिंग अँड फायनान्सचे 330,  बीएससी आयटीचे 320,  बीएससी कॉम्प्युटर सायन्सचे 256 प्रवेश झाले आहेत. 



Source link