टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत सूर्यकुमारकडे इतिहास रचण्याची संधी, विराटलाही टाकू शकतो मागे 

टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत सूर्यकुमारकडे इतिहास रचण्याची संधी, विराटलाही टाकू शकतो मागे 


Suryakumar Yadav in IND vs NZ : भारतीय क्रिकेट संघातील (Team India) सध्याचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) शानदार फॉर्ममध्ये आहे. खासकरून टी20 क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. सूर्यकुमारला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येऊन अजून दोन वर्षेही झाली नाहीत, पण त्याने आपला चांगलाच दबदबा निर्माण केलाय. सूर्यकुमार ज्याप्रकारे फॉर्मात आहे, विश्वचषकात त्याने चांगली कामगिरी केली.  त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही त्याच्याकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे. दरम्यान न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत सूर्याने चांगली कामगिरी केली तर तो विराट कोहलीचा एक रेकॉर्ड तोडून इतिहास रचू शकतो.

हा रेकॉर्ड म्हणजे एका कॅलेंडर ईयरमध्यये टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक सामनावीराचे पुरस्कार मिळवण्याचा रेकॉर्ड. 2016 मध्ये विराट कोहलीने टी-20 इंटरनॅशनलमध्ये 6 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला होता. सूर्यकुमारने या वर्षात आतापर्यंत 6 वेळाच हा पुरस्कार जिंकला आहे. ज्यामुळे सध्या हे दोघेही भारतीय खेळाडू आहेत ज्यांनी संयुक्तपणे एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक T20 आंतरराष्ट्रीय सामनावीराचे किताब जिंकले आहेत. त्यामुळे सूर्यकुमारने आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत एकदाही सामनावीराचा पुरस्कार जिंकला तर तो एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक T20 आंतरराष्ट्रीय सामनावीर जिंकणारा भारतीय ठरेल आणि कोहलीला मागे टाकेल. 

हेही वाचा :  टी-20 सामन्यात सुरक्षेसाठी प्रथमच होणार ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर

न्यूझीलंडविरुद्ध अशी असू शकते भारताची अंतिम 11? 

भारतीय संघ :
शुभमन गिल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर/संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर/दीपक हुडा, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

Reels

पदार्पणापासून दमदार फॉर्मात आहे सूर्या

मार्च 2021 मध्ये टी20 क्रिकेटद्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमारने आतापर्यंत 40 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 41.42 च्या दमदार सरासरीने 1 हजार 284 धावा केल्या आहेत. सूर्यकुमारने आतापर्यंत एक शतक आणि 12 अर्धशतकं ही झळकावली आहेत. T20 इंटरनॅशनलमध्ये सूर्यकुमारबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा स्ट्राइक-रेट आहे कारण त्याने सुमारे 180 च्या स्ट्राइक-रेटने धावा केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकातही जवळपास सर्वच सामन्यात तो दमदार फॉर्मात होता. त्याने आणि विराट कोहीलीनेच भारतीय फलंदाजी बऱ्यापैकी सावरली होती.

हे देखील वाचा-

Source link