“या 16 वर्षाच्या पोरीलाही आई करुन सोडून देणार,” 26 लग्नं करणाऱ्या 60 वर्षाच्या म्हाताऱ्याचा Video व्हायरल

“या 16 वर्षाच्या पोरीलाही आई करुन सोडून देणार,” 26 लग्नं करणाऱ्या 60 वर्षाच्या म्हाताऱ्याचा Video व्हायरल


Old man Married 26 times Divorced 22 Wives: लग्न (Marriage) म्हटलं तर प्रत्येकासाठी एक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. आयुष्यातील हा क्षण आपल्या कायमच्या लक्षात राहावा यासाठी तो थाटामाटात साजरा करण्याचा प्रयत्न असतो. याच दिवशी दोन जीव एकमेकांसोबत आयुष्यभरासाठी बांधले जातात. एकदा लग्न झालं की, ते नातं कायमचं टिकावं यासाठी प्रयत्न सुरु असतात. पण एखाद्या व्यक्तीने आपल्याला लग्नाची हौस असून त्यासाठी आपण वारंवार लग्न करुन घटस्फोट (Divorce) घेत असल्याचं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना..पण हे खऱं आहे. या व्यक्तीला लग्नाची इतकी हौस आहे की, आपल्या नातीच्या वयाच्या मुलींशीही तो लग्न करत आहे. 

आता याला तुम्हाला छंद म्हणा, हौस म्हणा किंवा म्हातारपणात आलेली लहर म्हणा. विशेष म्हणजे त्याचं वय तब्बल 60 वर्ष आहे. पाकिस्तानमधील (Pakistan) या व्यक्तीने 100 लग्नं करण्याचा निर्धार केला आहे. इतकंच नाही तर लग्न केल्यानंतर आपल्या पत्नींपासून मुलं जन्माला घालणं हे एकमेव ध्येय त्याचं आहे. मूल जन्माला येताच हा पत्नीला तलाक देतो आणि आपल्याला याचा अभिमान असल्याचं त्याचं म्हणणं आहे. 

हेही वाचा :  मागवला मिल्कशेक पण घरी आला लघवीने भरलेला कप, डिलिव्हरी बॉयने सांगितलं नक्की काय घडलं?

नातीच्या वयाच्या पोरींशी लग्न

सोशल मीडियावर या व्यक्तीची चांगलीच चर्चा सुरु आहे. त्याच्या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओत त्याने मुलाखत दिलेली दिसत असून ट्विटरला @activistjyot या हँडलला शेअर करण्यात आलं आहे. यामध्ये 60 वर्षीय व्यक्ती आपल्या सर्वात तरुण पत्नीसह बसलेला दिसत आहे. त्याच्या सध्याच्या घडीला चार पत्नी असून, त्यांचं वय 19 ते 20 वर्षांपेक्षा जास्त नाही. यांच्यापासून मुलं जन्माला घातल्यानंतर यांनाही सोडून देणार असं तो अभिमानाने सांगत आहे. मुलींच्या आई-वडिलांना त्याने आधीच ही गोष्ट सांगून ठेवली आहे. घटस्फोट देण्यासाठीच हा लग्न करत असून विशेष म्हणजे मुलींचे आई-वडिलही त्यासाठी तयार होत आहेत. 

100 लग्नं केल्याशिवाय थांबणार नाही

60 वर्षांच्या या व्यक्तीने 26 लग्नं केली असून 22 घटस्फोट दिले आहेत. आपल्या उर्वरित आयुष्यात 100 लग्नं करुन सर्वांना घटस्फोट देण्याचं त्याचं ध्येय आहे. त्याची एकूण 22 मुलंही आहेत, जी आपल्या आईंसोबत राहतात. घटस्फोटानंतर आपण पत्नीला राहण्यासाठी घर आणि खर्च दिला असल्याचं त्याने सांगितलं आहे. 

हेही वाचा :  पावसाची शक्यता दिसताच तुमच्या DTH कनेक्शनवर नो सिग्नल दिसतेय?, सोल्यूशनसाठी या ट्रिक्स बेस्ट

लग्न करणं आणि मुलं जन्माला घालणं ही त्याची हौस असल्याने तो हे कृत्य करत आहे. दरम्यान त्याचा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत असून अनेकांना धक्का बसला आहे. 



Source link