Loksabha Election 2024 : आज मतदानाचा अखेरचा टप्पा; 57 जागांसाठी चुरस, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : आज मतदानाचा अखेरचा टप्पा; 57 जागांसाठी चुरस, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला


Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी संपूर्ण देश सज्ज असून, या टप्प्यामध्ये 7 राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशातील 57 जागांसाठी मतदान घेतलं जात आहे. देशातील निवडणुकीचा हा अखेरचा टप्पा अतिशय महत्त्वाचा ठरणार असून, यामागं कारण ठरत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. वाराणासी येथील ज्या मतदारसंघातून मोदी निवडणुकीच्या रिंगणात आहेत तिथंही शनिवारीच मतदान होत असल्यामुळं राजकीय वर्तुळाच्या नजरा याच जागेकडे लागल्या आहेत. 

वाराणासीव्यतिरिक्त पंजाबच्या सर्व 13 जागा, हिमाचल प्रदेशातील 4, उत्तर प्रदेशातील 13, पश्चिम बंगालमधील 9, बिहारच्या 8, ओडिशातील 6 आणि झारखंडमधील 3 जागांवर मतदान पार पडत आहे. फक्त लोकसभाच नव्हे, तर, 1 जून अर्थात शनिवारी ओडिशा आणि हिमाचल प्रदेशात अनुक्रमे 42 आणि 6 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूकही पार पडत आहे. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या या अखेरच्या टप्प्यामध्टये एकूण 904 उमेदवार रिंगणात असून, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी, लालू प्रसाद यांची कन्या मीसा भारती, अभिनेत्री कंगना रणौत, रवि किशन, निशिकांत दुबे ही नावं रिंगणात आहेत. 

कशी आहे मतदारांची विभागणी? 

सातव्या टप्प्यातील मतदानासाठी  5.24 पुरुष आणि 4.82 कोटी महिला अशी मकतदारांची विभागणी असून, याशिवाय 3574 तृतीयपंथी मिळून एकूण 10.60 कोटींहून अधिक मतदार या मतदान प्रक्रियेचा भाह असतील. सातव्या टप्प्यातील मतदानासमवेत देशात 19 एप्रिलपासून सुरु झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेची सांगता होणार आहे. पुढील काही दिवसांत म्हणजेच 4 जून रोजी या महत्त्वाकांक्षी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून,  देशाच कोणाची सत्ता असणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. 

हेही वाचा :  7 मार्च ठरणार महत्त्वाची! नार्वेकरांविरोधातील याचिका प्रकरणात सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाची 'ती' मागणी स्वीकारली



Source link