IND vs WI 1st T20I: भारत पहिल्या टी20 सामन्यासाठी सज्ज, नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी

IND vs WI 1st T20I: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली आहे. आजच्या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी घेत एक नवी रणनीती अनुभवली असून आज भारत सामन्यात चेस करण्याच्या संपूर्ण तयारीने मैदानात उतरणार आहे. युवा फिरकीपटू रवी बिश्नोईने आज भारतीय संघात आगमन केलं आहे.

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश दिला. तीन सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकत भारत आता टी20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पार पडणारा हा पहिला टी20 सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर खेळवला जात आहे. एकूण तीन सामन्यांची ही मालिका असून तिन्ही सामने जिंकून या मालिकेतही क्लीन स्वीप देण्यासाठी भारत संपूर्ण प्रयत्न करणार हे नक्की.

पहिल्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघ (India’s T20I squad) 

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकिपर), वेंकटेश अय्यर, दीपक चहर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल

पहिल्या टी-20 सामन्यासाठी वेस्ट इंडीज संघ (WI T20I squad) 

ब्रँडन किंग, काईल मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकिपर), रोवमॅन पोवेल, कायरन पोलार्ड (कर्णधार), रोस्टन चेस, रोमारियो शेफर्ड, अकेल होसेन, ओडेन स्मिथ, फॅबियन अॅलन, शेल्डॉन कॉट्रेल

हे ही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

इंग्लंडविरुद्ध पहिला टी-20 खेळण्यासाठी टीम इंडिया उतरणार मैदानात; कधी, कुठे रंगणार सामना?

ENG vs IND, 1st T20I: भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेला (England Vs India) आजपासून …

ENG vs IND 1st T20: रोहित परतला, ऋतुराजला बाहेरचा रस्ता? अशी असू शकते दोन्ही संघाची प्लेईंग 11

England vs India: कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागणारा भारतीय संघ टी 20 मालिकेसाठी सज्ज …