IND vs WI, 1st T20 Live: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात टी20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. आज पहिला टी20 सामना (1st T20match) कोलकात्याच्या ईडन गार्डन्स (Eden Garden Stadium) या क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येत आहे. एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकत भारत आता टी20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील हा सामना चुरशीचा होणार कारण दोन्ही संघ टी20 फॉर्मेटमध्ये उत्तम आहेत. दोन्ही संघामध्ये स्पेशलिस्ट टी20 खेळाडू असल्याने संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष या सामन्याकडे असणार आहे.
या मालिकेपूर्व, केएल राहुल, अक्षर पटेल आणि वॉशिग्टंन सुंदर दुखापतग्रस्त झाले. ज्यांच्या जागी, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा आणि कुलदीप यादव यांना संघात स्थान मिळालं आहे. नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात भारत हवी तशी कामगिरी करु शकलेला नाही. त्यात आता टी20 स्पेशलिस्ट संघासोबत भारताची गाठ आहे. त्यामुळे सावध पण आक्रमक खेळ करु भारताला विजय मिळवावा लागणार हे नक्की.
पहिल्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघ (India’s T20I squad)
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकिपर), वेंकटेश अय्यर, दीपक चहर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल
पहिल्या टी-20 सामन्यासाठी वेस्ट इंडीज संघ (WI T20I squad)
ब्रँडन किंग, काईल मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकिपर), रोवमॅन पोवेल, कायरन पोलार्ड (कर्णधार), रोस्टन चेस, रोमारियो शेफर्ड, अकेल होसेन, ओडेन स्मिथ, फॅबियन अॅलन, शेल्डॉन कॉट्रेल
उर्वरीत टी-20 सामन्यांचं वेळापत्रक
दुसरा टी-20 सामना- 18 फेब्रुवारी (कोलकाता, ईडन गार्डन)
तिसरा टी-20 सामना- 20 फेब्रुवारी (कोलकाता, ईडन गार्डन)
सामना प्रेक्षकांविना –
“बीसीसीआयने पहिल्या सामन्यासाठी प्रायोजक आणि प्रतिनिधींसाठी फक्त हॉस्पिटॅलिटी बॉक्सेसना परवानगी दिली आहे. याचदरम्यान बंगाल क्रिकेट असोसिएशननं बीसीसीआयला यावर पुनर्विचार करण्याची आणि अखेरच्या दोन सामन्यांसाठी प्रेक्षकांना परवानगी देण्याची विनंती केलीय. तसेच बोर्डाकडून परवानगी मिळताच प्रेक्षकांना कळवण्यात येईल, असंही बंगाल क्रिकेट असोसिएशननं त्यांच्या निवेदनात म्हटलंय.