Potatoes Quality check : सावधान, कधीच खरेदी करू नका या रंगाचे बटाटे, असू शकतात विषारी, एक्सपर्ट्सनी सांगितली महत्त्वाची माहिती..!

Potatoes Quality check : सावधान, कधीच खरेदी करू नका या रंगाचे बटाटे, असू शकतात विषारी, एक्सपर्ट्सनी सांगितली महत्त्वाची माहिती..!


खरं तर स्वयंपाक ही कला असेल तर त्यातील पदार्थाची क्वालिटी समजून घेणे हे शुद्ध शास्त्र आहे. प्रत्येक पदार्थाची चव तर महत्त्वाची असतेच पण ती अशी का आहे यामागील शास्त्र जाणून घेतले पाहिजे. आता बटाट्याकडेच बघा ना. हा एक अष्टपैलू पदार्थ आहे, जो कोणत्याही भाजीसोबत मिसळल्यास एक उत्तम कॉम्बिनेशन बनते. याशिवाय लोक ते साइड डिश म्हणूनही वापरतात. बरेचजण त्याचा भाजी, सूप आणि पुलावमध्येही वापर करतात. बटाट्याशिवाय कोणतीही भाजी पूर्ण होऊच शकत नाही. तुमच्यापैकी अनेकांनी कधी न कधी बाजारातून बटाटे खरेदी केलेच असतील.

जेव्हा तुम्हाला बटाट्यांवर हिरवे डाग दिसतात तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही ते बाजूला ठेवता किंवा जास्त विचार न करता सरळ खरेदी करता? असो, हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते. पण बटाट्याच्या हिरव्या रंगामागे नक्कीच काहीतरी कारण असते, जे आपण जाणून घेतले पाहिजे. तज्ञांच्या मते, हिरवे बटाटे त्यात विषारी संयुगाची उच्च पातळी आहे हे दर्शवू शकतात. बटाटे हिरवे का होतात आणि ते खाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहेत का ते आज आपण जाणून घेऊया.

हेही वाचा :  Blood thinner food : रक्त घट्ट झाल्यामुळे वाढतो ब्लड क्लॉट व हार्ट अटॅक सारख्या भयंकर आजारांचा धोका, रक्त पातळ करण्यासाठी खा ‘हे’ 5 स्वस्तातले पदार्थ..!

बटाटे हिरवे का पडतात?

विज्ञानानुसार जेव्हा बटाटे थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांचा रंग हिरवा होऊ लागतो. हा हिरवा रंग क्लोरोफिलपासून येतो. प्रकाश संश्लेषणासाठी म्हणजेच फोटोसिंथेसिससाठी क्लोरोफिल खूप आवश्यक आहे. ही अशी प्रक्रिया आहे जी झाडे स्वतःला पोसण्यासाठी किंवा अन्न देण्यासाठी वापरतात. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यामुळे बटाट्यांमधील क्लोरोफिलच्या उत्पादनास गती मिळते. यामुळेच त्यांना पुन्हा एका अंधाऱ्या खोलीत स्टोर करून ठेवावे लागते.

(वाचा :- Lalu Prasad Yadav health : लालू प्रसाद यादव आहेत ‘या’ 8 भयंकर आजारांनी ग्रस्त, अवस्था झालीये गंभीर, करावं लागलं हॉस्पिटलमध्ये भरती..!)

हिरवे बटाटे खाणं सुरक्षित आहे का?

आपल्यापैकी बरेचजण हिरवे बटाटे खातात कारण त्यांना ते खाणे किती हानिकारक आहे हे माहितच नसते. नॅशनल कॅपिटल पॉयझन सेंटरच्या मते, ‘हिरवे बटाटे मानवी वापरासाठी योग्य नाहीत. यामुळे मळमळ, अतिसार यासारख्या पाचन समस्यांसोबतच डोकेदुखी आणि तांत्रिक संबंधित समस्या उद्भवू शकतात. तज्ञांच्या मते, एक चांगला नियम असा आहे की जर शिजवलेल्या बटाट्याची चव कडू असेल तर ते बटाटे हिरवे आणि खाण्यास सुरक्षित नसल्याचे लक्षण आहे. याचे कारण म्हणजे हिरव्या बटाट्यामध्ये सोलनिन नावाचे संयुग जास्त प्रमाणात असते आणि सोलनिनची वाढलेली पातळी बटाट्यात कडू चव आणते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्याही उद्भवू शकतात.

(वाचा :- Yoga for Headache : औषधांमधून व्हा मुक्त, 150 प्रकारच्या डोकेदुखींना मुळापासून संपवतात ‘ही’ 12 योगासने आणि टेकनिक्स..!)

हेही वाचा :  सकाळी रिकाम्या पोटी हे फळ खाल्यास आतड्यांमधील घाण, नसांमध्ये चिकटलेले कोलेस्ट्रॉल, म्हातारपण व कॅन्सरचा धोका होईल दूर!

ही समस्या ठीक कशी करावी?

जर तुम्ही मोठ्या प्रमाणात हिरवे बटाटे आणले असतील तर ते संपूर्ण बटाटे फेकून द्यावे का? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. पण मंडळी याची अजिबात गरज नाही. जर बटाट्याचा थोडासा भाग हिरवा झाला असेल तर तुम्ही तो काढून टाकू शकता. युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरच्या म्हणण्यानुसार, जर बटाट्याची फक्त साल हिरवी झाली असेल तर ते सोलून घ्या आणि नंतरच खा. आम्‍ही तुम्‍हाला सांगू की त्‍याच्‍या सालीमध्‍ये सर्वाधिक प्रमाणात सोलनिन आढळते, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. बटाटे नेहमी अंधा-या ठिकाणी साठवले पाहिजे. विशेषज्ञ सल्ला देतात की बटाटे लवकर हिरवे होणे टाळण्यासाठी त्यांना नेहमी थेट सूर्यप्रकाश पोहचेल अशा जागेपासून दूर ठेवा.

(वाचा :- पिझ्झा-बिअरच्या नादात 110 किलोवर पोहचलं होतं वजन, ‘ही’ खास ट्रिक वापरून घटवलं तब्बल 30 किलो वजन..!)

बटाटे कसे स्टोर करावेत?

पॅंट्री किंवा कॅबिनेट सारखी थंड जागा बटाटे स्टोर करण्यासाठी सर्वोत्तम आहे. बेसमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात बटाटे साठवण्यासाठी केला जातो. तसेच, रेफ्रिजरेटरसारख्या उष्णता कमी करणाऱ्या कोणत्याही उपकरणांपासून त्यांना दूर ठेवा. संपूर्ण हिरवे बटाटे विषारी असू शकतात आणि त्यांना खाण्यासाठी सुरक्षित करण्याचा कोणताही मार्ग नाही. ज्या व्यक्तीला हिरवे बटाटे वाया घालवायचे नाहीत, ते जमिनीत किंवा कुंडीत ते लावू शकतात. जर हे अंकुरलेले असेल तर त्यापासून नवीन बटाटे तयार होतील, जे खाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असतील.

हेही वाचा :  माझी मुलं फक्त वाद घालतात, जावेद अख्तर यांनी व्यक्त केली हळहळ, मुलांसोबत का निर्माण होतात अशा समस्या

(वाचा :- Piles home treatment : भयंकर अवस्थेत पोहचलेला मुळव्याधही होऊ शकतो झटक्यात बरा, स्वयंपाकघरातील ‘या’ 4 गोष्टी ठरतील रामबाण..!)

मोड आलेले बटाटेही वाईट

मोड आलेल्या बटाट्यांचं सेवन हे आरोग्यासाठी हानीकारक आहे. भरपूर दिवस बटाटे ठेवल्यामुळे त्यांना मोड आले असल्यास त्या बटाट्यांचं सेवन करू नये. कारण असे बटाटे तुमच्या नर्व्हस सिस्टमसाठी हानीकारक असतात. त्यामुळे पुढच्या वेळी बटाटे विकत घेताना वरील काळजी नक्की घ्या.

(वाचा :- Roti For Weight Loss : पोट व कंबरेवरची चरबी कमी करते ‘या’ पिठापासून बनलेली चपाती, 1 आठवड्यातच दिसू लागेल कमालीचा फरक!)

Source link