माझी कहाणी : मी 25 वर्षांची तरूणी आहे आणि माझं 50 वर्षांच्या व्यक्तीवर प्रेम जडलंय, मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे पण…!

माझी कहाणी : मी 25 वर्षांची तरूणी आहे आणि माझं 50 वर्षांच्या व्यक्तीवर प्रेम जडलंय, मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे पण…!


प्रश्न : माझे वय 25 वर्षे असून मी एक अविवाहित तरूणी आहे आणि मी एका 50 वर्षांच्या व्यक्तीच्या प्रेमात आहे. कोणत्याही मुलीप्रमाणे माझी सुद्धा अपेक्षा होती की मला देखील असा कोणीतरी व्यक्ती वा जोडीदार मिळावा जो माझ्या स्वप्नातील राजकुमार असेल. पण आता झाले असे की माझ्या सगळ्या अपेक्षा हा 50 वर्षाचा व्यक्ती पूर्ण करतो आहे. तो मला अजिबात कसली कमी भासू देत नाही. मला नेहमी स्पेशल फिल करण्यासाठी झटत असतो. त्याच्यासोबत असताना मला खूप सुरक्षित वाटतं. त्यामुळे मला जे हवं ते मिळालं आहे पण वय ही एक समस्या आहे. मात्र मला त्याच्याशी लग्न करून संसार थाटायला आवडेल. पण मला पब्लिकली जोडीदार म्हणून त्याचा स्वीकार करण्यास भीती वाटते आहे.

मला काळजी वाटते आहे की मी जी निवड केली आहे त्यावर लोकं हसतील आणि माझी खिल्ली उडवतील. मला अजिबात कळत नाहीये मी काय करू? तो या नात्याबाबत अगदी बिनधास्त आहेत. त्याच्याकडे पैसा सुद्धा खूप आहे त्यामुळे माझे भविष्य सुद्धा सुरक्षित आहे. पण मला एक जोडीदार म्हणून सार्वजनिकपणे त्याला स्वीकारणे मला जड जात आहे. मला सतत भीती वाटते की बाहेर फिरताना कोणी पाहिले तर माझ्याबाबत काय विचार करतील. मग अशा परिस्थीतीत मी माझ्यासाठी परफेक्ट असणारा जोडीदार शोधावा की त्या 50 वर्षांच्या व्यक्तीला स्विकारण्याचं धाडस करावं? (गोपनीयतेच्या कारणाने आम्ही सदर व्यक्तीची ओळख उघड करू शकत नाही.)

एक्सपर्ट्सचे उत्तर

फोर्टीस हेल्थ केअर मधील मानसिक स्वास्थ्य विभागाच्या प्रमुख कामना छिब्बर या प्रश्नाचे निरसन करताना म्हणतात की, मी तुमची स्थिती समजू शकते. एवढ्या लहान वयात आयुष्याबद्दलचा एवढा मोठा निर्णय घेणे खरंच सोप्पे नाही. पण मला वाटते की जर तुमचे खरे प्रेम असेल यर तुम्ही समाजाला न घाबरता समाजाला थेट तोंड दिले पाहिजे. तुम्ही निवडलेल्या व्यक्तीची आपले कुटुंब आणि मित्र मंडळी यांच्याशी ओळख करून द्या. एकमेकांशी ओळख झाल्याने अनेकदा गोष्टी बदलू शकतात. गैरसमज दूर होऊ शकतात. लग्न ही अशी गोष्ट आहे ज्यात केवळ नवरा बायकोच नाही तर कुटुंब सुद्धा एक महत्त्वाचा घटक असते. ते जर सोबत असेल तर अनेक गोष्टी सोप्प्या होऊ शकतात. कुटुंबाशिवाय समाजात चालणं खूप कठीण असतं ज्याचा सामना करावा लागू नये म्हणून जवळच्या व्यक्तींची तुमच्या नात्याबद्दलची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचा :  म्यानमार आणि थायलंडमधील महिला वर्षानुवर्षे गळ्यात घालतात धातुच्या काड्या

(वाचा :- जोडीदाराशी कितीही टोकाची भांडणे झाली तरी नातं तुटणार नाही याची हमी, फक्त फॉलो करा ‘या’ टिप्स!)

तब्बल 25 वर्षांचा फरक

-25-

पुढे डॉक्टर असेही म्हणतात की, तुमच्या वयात तब्बल 25 वर्षांचा फरक आहे. तुम्ही जरी आता लग्नाचा निर्णय घेतला तरी साहजिक हा निर्णय सामान्य कपल्सच्या निर्णयापेक्षा वेगळा असेल. कारण काही काळाने गोष्टी बदलतील. आज सोबत असलेला जोडीदार काही वर्षांनी सोबत नसेल. मिळत असलेले प्रेम अचानक दूर निघून जाईल. अशा स्थितीत तुम्ही कशा जगाल आणि स्वतःला कशा सांभाळाल याचा देखील विचार तुम्ही केला पाहिजे. प्रेमाच्या धुंदीत अनेक गोष्टी आता छान वाटतायत पण त्या तशाच असतील याची खात्री देता येत नाही.

(वाचा :- “मी मलायकावर आजही जीवापाड प्रेम करतो, पण मला या गोष्टीची भीती आहे की..” अरबाज खानचं हे वक्तव्य वाचून तुम्हीही व्हाल थक्क..!)

खूप विचार करून निर्णय घ्यावा

लग्न ही अशी गोष्ट आहे जी साहजिकच वाटते तितकी सोप्पी नाही. अशावेळी तुम्ही सारासार विचार करून मगच लग्नाचा निर्णय घेणे इष्ट आहे. जस जसे आपले वय वाढत जाते तसतसं आपल्या इच्छा, आकांक्षा, लक्ष्य, दृष्टीकोन आणि स्वप्न बदलत जातात. या स्थितीत आयुष्यात अशी सुद्धा वेळ येऊ शकते जेव्हा तुम्हाला तुम्ही घेतलेला निर्णय चुकला की काय असे वाटू शकते. अर्थात आता जो निर्णय योग्य वाटतोय तो कदाचित नंतर तुमच्या वयाचा मुलगा व अपक्षेपेक्षा जास्त यशस्वी, सुंदर मुलगा भेटल्यावर चूकीचा वाटू लागेल. कदाचित तुम्ही इतर मित्रमैत्रीनींना एका परफेक्ट पार्टनरसोबत बघाल तेव्हाही ही वेळ येऊ शकते. ही वेळ येऊच नये असे वाटत असेल तर आताच योग्य निर्णय घ्या आणि त्यावर ठाम राहा. जर तुमची मानसिक स्थिती चंचल असेल तर पुढे त्रास होऊ शकतो. भविष्यात दुस-या व्यक्तीला बघून निर्णय बदलणार असेल तर हे नातं इथेच संपवणं योग्य आहे.

हेही वाचा :  'गणेशोत्सवात तरुणांची श्रमशक्ती वाया जाते'; लेखक सुरज एंगडेंचे मत

(वाचा :- माझी कहाणी : माझा नवरा मला दुस-या पुरूषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची जबरदस्ती करतो, ज्यासाठी तो मला परपुरुषांशी भेटही घालून देतो)

काय आहे लग्नाचे योग्य वय

अनेकदा आपल्याला आसपासची लोकं सांगतात की योग्य वयात लग्न झाले पाहिजे, योग्य वयात संसार सुरु झाला पाहिजे. पण लग्नासाठी एखादे ठराविक वय योग्य असते ही एक अंधश्रद्धा आहे. जोवर तुम्ही मनापासून लग्नासाठी तयार नसाल तोवर लग्न करू नये. कारण मानसिक शांती सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. एखाद्या लग्नासाठी तुम्ही तयारच नसाल आणि केवळ लग्न करायचे म्हणून करत असाल किंवा समाजाला दाखवायला लग्न करत असाल तर असे लग्न तुम्हाला जास्त सुख देऊ शकत नाही.

(वाचा :- माधुरी दीक्षित लग्नानंतर अमेरिकेत गेली आणि आयुष्यात आलं एक विचित्र वळण, घ्यावा लागला भारतात परतण्याचा निर्णय..!)

लग्न करताना दबाव नसावा

लग्न कधीच दबावाखाली करू नये. तुम्हाला स्वत:वर आणि तुमच्या जोडीदारावर पूर्ण विश्वास असेल तेव्हाच लग्नाचा निर्णय घ्यावा. लग्न कर लग्न कर म्हणून तगादा लावणारी लोकं जेव्हा संसारात समस्या येतील तेव्हा त्या सोडवण्यासाठी पुढे येणार नाहीत. त्यामुळे एकदा लग्न झालं की ती केवळ आपली लढाई असते. त्यामुळे जोवर मन तयार होत नाही तोवर लग्नाचा विचार मनात आणू नये. तुमच्या पूर्ण मानसिक तयारी असेल तर तुम्ही तुमच्या संसारासाठी शंभर टक्के देऊ शकता आणि सुखी आयुष्य जगू शकता. जर असे होणार नाही असे तुम्हाला वाटत असेल तर लग्न न करणे उत्तम!

हेही वाचा :  माझी कहाणी - मला माझ्या नव-याच्या गुप्त कपाटातून एक असे सामान मिळाले, ज्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली..!

(वाचा :- माझी कहाणी : सासरच्या लोकांनी मला जेलमध्ये टाकलं आणि माझ्या प्रेग्नेंट बायकोचं जबरदस्ती दुसरं लग्न लावून दिलं, मग पुढे..!)

Source link