म्यानमार आणि थायलंडमधील महिला वर्षानुवर्षे गळ्यात घालतात धातुच्या काड्या

भारतातच नाही तर जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी माहिलांवर अनेक निर्बंध लावले जातात. चूल आणि मूल या दुष्टचक्रातून आता कुठे महिला बाहेर पडत आहेत. असे असताना म्यानमार आणि थायलंडच्या उत्तर भागात गेल्या अनेक (old tradition in Myanmar and Thailand) वर्षांपासून या परंपरेचं पालन होताना दिसतं. या परंपरेत महिला गळ्यामध्ये कड्या अडकवताना दिसतात. अनेक वर्षांपासून भारताच्या शेजारील देशात विचित्र परंपरा पाळली जाते. National Geographic च्या एका डॉक्युमेंट्रीमध्ये ही सर्व माहिती घेण्यात आली आहे. (फोटो सौजन्य :- istock)

कुठे आहे ही परंपरा​

कुठे आहे ही परंपरा​

म्यानमार आणि थायलंडच्या उत्तर भागात या परंपरेचं पालन होते. ही परंपरा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. आता परंपरा म्हटली तर त्यामगे काही कारणे देखील असणार. म्यानमार आणि थायलंडमधील अनेक आदिवासी जमातींमध्ये ही प्रथा पाहायला मिळते. महिलांच्या गळ्यात धातूच्या कड्या घातल्या जातात. त्यामुळे महिलांच्या मान प्रमाणापेक्षा जास्तच उंच दिसते. त्यांना पाहिल्यावर असे वाटते की जणू एखाद्या धातूच्या कड्यावर मान ठेवली आहे असे वाटतं. अनेक वर्षांपासून या प्रथेचं पालन केलं जात असून त्यामागे नेमकं काय आहे, याची कुणालाच नेमकी माहिती नाही.

हेही वाचा :  Office Wear Ideas: उन्हाळ्याच्या दिवसात ऑफिस मध्ये कम्फर्टेबल व स्टायलिश दिसण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात| fashion beauty office wear ideas for women to look stylish and comfortable

(वाचा :- केसगळतीवर घाबरून जाऊ नका, एका आठवड्यात थांबेल केस गळणं, बाबा रामदेव यांनी सांगितला रामबाण उपाय) ​

वाघांपासून संरक्षण

वाघांपासून संरक्षण

काही जाणकारांच्या मते या भागात वाघांची संख्या मोठी होती. आदिवासी समाज हा जंगलात राहतो. त्यामुळे वन्यप्राण्यापासून खास करून वाघांच्या हल्ल्याची भीती असायची. वाघ जेव्हा हल्ला करतो, तेव्हा सर्वप्रथम तो मानेचा चावा घेण्याच्या प्रयत्न करतो. अशा हल्ल्यांपासून वाचण्यासाठीच ही प्रथा पडली असावी, असं काही अभ्यासक सांगतात. वाघाच्या तावडीत एखादी महिला सापडली तरी सहजासहजी वाघाला तिच्या गळ्याला जखम करता येऊ नये. यासाठीच या प्रथेचा उगम झाला असाव असे मानले जाते.

(वाचा :- ऋजुता दिवेकर यांनी सांगितले सौंदर्य खुलवण्याचे तीन घरगुती उपाय, करिना कपूर ही करते या गोष्टीचे पालन) ​

शत्रूचं आक्रमण

शत्रूचं आक्रमण

त्याचप्रमाणे जंगलांमध्ये अनेक लुटारू टोळ्या यायच्या आणि महिलांना घेऊन जायच्या. अशा प्रकारे मानेत कडे असतील, तर महिला कुरुप दिसतील आणि दरोडेखोर त्यांना घेऊन जाणार नाहीत. असा देखील विचार केला जातो.

(वाचा :- कोरियन आणि जपानी मुलींच्या काचेसारख्या त्वचेचे रहस्य तुमच्या स्वयंपाकघरात, तांदळाच्या पाण्याचा असा करा वापर)​

हेही वाचा :  Maharashtra Budget 2023: विधानसभेत श्रद्धा वालकरचा उल्लेख करत शिंदे सरकारचा मोठा दावा

महिलांच्या त्वचेवर होतो हा परिणाम

महिलांच्या त्वचेवर होतो हा परिणाम

या प्रथेनुसार लहान वयातच असे धातूचे कडे मुलींना घातले जातात. त्या जशा मोठ्या होतील, तसे हे कडे मानेभोवती आवळतात आणि कॉलरचं हाड दबलं जातं. या हाडाचा विकासच न झाल्यामुळे महिलांची मान सामान्यांपेक्षा अधिक उंच आणि विचित्र दिसते.

(वाचा :- ऐकाल तर नवल ! मुलीने क्रिमऐवजी चेहऱ्याला लावली मेहंदी, पुढे जे झालं ते बघून गडबडून जाल) ​

मानेभोवती जखमा​

मानेभोवती जखमा​

अनेक महिलांना या धातूच्या कड्यांमुळे जखमाही होत असल्याचं सांगितलं जातं. या जखमा सहजा सहजी बऱ्या देखील होऊ शकत नाही.

(टिप :- हा लेख माहितीपटातून मिळणाऱ्या माहितीवर आधारित आहे.)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Sharad Pawar: नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं धोकादायक…; सांगोल्यातील सभेत शरद पवारांची टीका

Sharad Pawar: शुक्रवारी लोकसभेच्या निवडणूकीचा दुसरा टप्पा पार पडला. तर दुसरीकडे उर्वरित टप्प्यांसाठी प्रत्येक पक्षाकडून …

Maharashtra Weather: राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा; पाहा मुंबईत कसं असेल हवामान?

Maharashtra Weather : सध्या देशभरात नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय. याशिवाय राज्यात उन्हाचा चटका …