वाचा : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना रोमित चव्हाण, संतोष यादव शहीद
निलंबित विद्यार्थिनींना कॉलेजमध्ये येऊ नका असे सांगण्यात आल्याचे एका विद्यार्थिनीने पत्रकारांना सांगितले. शुक्रवारी कारवाई झाल्यानंतर शनिवारी विद्यार्थिनींनी कॉलेजात येऊन हिजाबच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. मात्र, त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. ‘आम्ही कॉलेजात पोहोचलो. पण, आम्हाला निलंबित करण्यात आले असून, कॉलेजमध्ये येण्याची गरज नाही, असे प्राचार्यांनी सांगितलं. पोलिसांनीही आम्हाला कॉलेजमध्ये न येण्यास बजावले होते, तरीही आम्ही आलो. आज आमच्याशी कोणीही बोलले नाही,’ असेही काही विद्यार्थिनींनी सांगितले.
वाचा :हिजाब घालून मतदानाला आलेल्या महिलांना भाजपच्या बुथ एजंटने रोखताच…
दावणगेरे जिल्ह्यातील हरिहर येथील एसजेव्हीपी कॉलेजमध्ये हिजाब घातलेल्या मुलींना प्रवेश दिला जात नव्हता. विद्यार्थीनींनीही हिजाबशिवाय आत येणार नाही. आमच्यासाठी हे शिक्षणाइतकेच महत्त्वाचे आहे आणि आम्ही आपला हक्क सोडू शकत नाहीत, असा पवित्रा घेतला. बेळगाव जिल्ह्यातील विजय पॅरामेडिकल कॉलेजमधील विद्यार्थिनींनी पत्रकारांना सांगितले की, संस्थेने हिजाबच्या समस्येमुळे अनिश्चित काळासाठी सुट्टी जाहीर केली आहे. एका विद्यार्थिनीने सांगितले, ‘आम्ही हिजाबशिवाय कॉलेजमध्ये बसणार नाही. याचा आमच्या शिक्षणावर कसा परिणाम होतो, हे कॉलेजने समजून घेतले पाहिजे. प्राचार्य आमचे ऐकत नाहीत.’
अशीच परिस्थिती बेल्लारी येथील सरला देवी कॉलेज आणि कोप्पल जिल्ह्यातील गंगावती येथील शासकीय महाविद्यालयात पाहायला मिळाली. रामनगर जिल्ह्यातील कुदुर गावात काही विद्यार्थिनींनी वर्गात प्रवेश न मिळाल्याने कॉलेजच्या मैदानावर निषेध केला.
वाचा : कुमार विश्वास यांना केंद्राची सुरक्षा; केजरीवालांवर ‘तो’ आरोप केल्याने…