DC vs MI : मुंबई इंडियन्सला पराभवानंतर आणखी एक झटका, कर्णधार रोहित शर्माला 12 लाखांचा दंड

DC vs MI : मुंबई इंडियन्सला पराभवानंतर आणखी एक झटका, कर्णधार रोहित शर्माला 12 लाखांचा दंड


IPL 2022 DC vs MI : आयपीएल 2022 च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात मोठे लक्ष्य असतानाही मुंबईचा रोमांचकारी पराभव झाला. या पराभवासोबतच मुंबई इंडियन्सला आणखी एक झटका बसला आहे. कर्णधार रोहित शर्माला स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर 4 गडी राखून विजय मिळवला.

रविवारी झालेल्या मुंबई विरुद्ध दिल्ली (DI vs MI) सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलने म्हटले आहे, ‘मुंबई इंडियन्सना 27 मार्च रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर टाटा इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 विरुद्धच्या दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यादरम्यान स्लो ओव्हर-रेट राखल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे.’ 

ओव्हर रेटचा संघाचा हा पहिलाच गुन्हा आहे, त्यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 178 धावांचे लक्ष्य ठेवले होते. यादरम्यान रोहितने 41 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर इशान किशनने 81 धावा केल्या. त्याने 48 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकार मारले. त्यानंतर दिल्लीच्या संघाने 18.2 षटकांत 6 गडी गमावून सामना जिंकला. संघाकडून ललित यादव आणि अक्षर पटेल यांनी शानदार खेळी केली.

हेही वाचा :  पुन्हा संजू सॅमसनला वगळल्यानं चाहते भडकले; सोशल मीडियावर 'वी वॉन्ट संजू' ट्रेन्ड सुरू

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link