Career Growth Tips: करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर मिळेल यश, ‘या’ ३ गोष्टी ठेवा लक्षात

Career Growth Tips: करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर मिळेल यश, ‘या’ ३ गोष्टी ठेवा लक्षात


Authored by Pravin Dabholkar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 30 Dec 2022, 6:00 pm

Career Growth Tips: तुम्ही तुमच्या आयुष्यात काय आहात आणि भविष्यात काय करणार आहात याचे सर्व श्रेय आपण घेतलेल्या निर्णयाला जाते. अशा परिस्थितीत करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे वेळीच विचार समजून घेणे आणि ती योजना राबविणे हे चाणाक्ष लोकांचे लक्षण आहे. यश मिळवायचे असेल तर विचारपूर्वक निर्णय घ्या आणि त्या योजनेवर कायम राहा. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी ३ निर्णय महत्वाचे ठरतील.

 

Career Growth Tips
करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर मिळेल यश, ‘या’ ३ गोष्टी ठेवा लक्षात

हायलाइट्स:

  • करिअरच्या प्रत्येक निर्णयात तुम्हाला मिळेल यश
  • यश मिळविण्यासाठी विचारपूर्वक निर्णय महत्वाचा
  • यशस्वी होण्यासाठी ३ महत्वाच्या टिप्स
हेही वाचा :  ऑफलाइन शाळा सुरु करण्यास परवानगी, जाणून घ्या नवी नियमावली
Career Growth Tips: तुम्ही तुमच्या आयुष्यात काय आहात आणि भविष्यात काय करणार आहात याचे सर्व श्रेय आपण घेतलेल्या निर्णयाला जाते. अशा परिस्थितीत करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे वेळीच विचार समजून घेणे आणि ती योजना राबविणे हे चाणाक्ष लोकांचे लक्षण आहे. कधी कधी अतिविचारामुळे काही निर्णय चुकतात. म्हणूनच तुम्ही जास्त विचार करणे टाळले पाहिजे. यश मिळवायचे असेल तर विचारपूर्वक निर्णय घ्या आणि त्या योजनेवर कायम राहा. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी ३ निर्णय महत्वाचे ठरतील.

परफेक्शनिस्टची व्याख्या समजून घ्या

सुरुवातीपासूनच परफेक्ट बनण्याच्या मागे धावू नका. प्रत्येक काम परफेक्ट झाले पाहिजे असा सल्ला आपल्याला अनेकजण देतात. पण सतत त्यामागे धावल्याने आपले निर्णय चुकू शकतात. अशावेळी परफेक्शनिस्टचे कॉन्सेप्ट ‘सर्वच’ किंवा ‘काहीच नाही’ यावर ठरते. असे करताना ‘काहीच नाही’ला आपण निवडतो. याचा करिअरवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे परफेक्शनिस्टच्या मागे धावण्यापेक्षा कोणता निर्णय तुमच्यावर सकारात्मक परिणाम करेल हे स्वतःला विचारले पाहिजे.

१०/१०/१० ची चाचणी करा

तुम्हाला कोणत्याही निर्णयाबद्दल शंका असल्यास, तुम्ही ताबडतोब १०/१०/१० चाचणी करावी. या चाचणीचा सरळ अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या निर्णयाची तीन भागात विभागणी करा. तुम्ही कोणताही निर्णय घेत आहात, त्या निर्णयापासून १० आठवडे, १० महिने किंवा १० वर्षांनी, त्यावर तुमचे मत काय असेल किंवा त्या निर्णयाचा तुम्हाला किती फायदा होईल याचा विचार करा.

हेही वाचा :  Delhi University Reopen: दिल्ली विद्यापीठातील महाविद्यालये आजपासून सुरु

‘आम्ही तुम्हाला नोकरी का द्यायची?’, मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाचे ‘असे’ द्या प्रभावी उत्तर
Career Tips: अनुभव नसला तरी सहज मिळेल चांगल्या पगाराची नोकरी, जाणून घ्या ५ टिप्स

अंतर्मनाचा आवाज ऐका

जेव्हा तुम्ही एखाद्या निर्णयाबाबत संभ्रमात असाल, तेव्हा तुम्ही तुमच्याअंतर्मनाच्या आधारे निर्णय घ्यावा. जेव्हा अंतर्ज्ञान आणि विश्लेषणात्मक विचारांची सांगड घातली जाते, तेव्हा तुम्ही स्मार्ट निर्णय घेऊ शकता असे एका संशोधनातून समोर आले आहे.

Career Tips: येत्या ५ वर्षांत तुम्हाला काय करायचे आहे? करिअर प्लानिंगचा होईल खूप फायदा; टिप्स जाणून घ्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link