ब्रेकअप झाल्यावर प्रिन्सेस डायनाने परिधान केला डीपनेक बोल्ड ब्लॅक ड्रेस, आज ‘रिव्हेंज ड्रेस’ म्हणून प्रसिद्ध

ब्रेकअप झाल्यावर प्रिन्सेस डायनाने परिधान केला डीपनेक बोल्ड ब्लॅक ड्रेस, आज ‘रिव्हेंज ड्रेस’ म्हणून प्रसिद्ध


राजकुमारी डायना यांना केवळ दयाळूपणाने नाही तर एक स्टाईल आयकॉन देखील होती. आजही फॅशन आयकॉन म्हणून तिचा उल्लेख करतात. वेगवेगळ्या प्रसंगी परिधान केलेल्या तिच्या पोशाखांची देखील चर्चा करतात. राजकुमारी डायनाच्या स्टाईलिश पोशाखांचा उल्लेख करणे आणि त्या काळ्या ड्रेसबद्दल बोलणे निव्वळअशक्य आहे. डायनाच्या या आयकॉनिक ब्लॅक ड्रेसला ‘रिव्हेंज ड्रेस’ म्हटले जायचे. चला तर मग आज प्रिन्सेस डायना या ब्लॅक रिव्हेंज ड्रेसची कहाणी जाणून घेऊयात. (फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया)

​डायनाचा तो बोल्ड लूक

29 नोव्हेंबर 1994 रोजी व्हॅनिटी फेअरच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी लेडी डायना लंडनला गेल्या होत्या. यावेळी त्यांनी ऑफ शोल्डर आणि स्वीटहार्ट नेकलाइन असलेला काळा ड्रेस आणि डायनाचे हेअरकट आणि नेकपीस सर्वच परफेक्ट दिसत होते. प्रिन्सेस डायना गाडीतून उतरताच सगळ्यांनी तिला पाहिले. आणि कोणाच्याही नजरा तिच्यावरुन हलल्या नाहीत. (वाचा :- त्या रात्री रडून मला श्वास घेणं ही कठीण झालं होतं, दुसऱ्या मुलीसाठी त्याने मला सोडलं, जे झालं ते ऐकून हादरुन जाल)

हेही वाचा :  रणवीरचं रॅप ऐकून चाहते नाखूश... व्हिडीओवर कमेंट करून केली नाराजी व्यक्त!

​काय आहे काहणी

या दिवशी दिवशी प्रिन्स चार्ल्सने एका टेलिव्हिजन मुलाखतीत लग्नाबाहेरील संबंध असल्याचे कबूल केले होते. चार्ल्सने ‘चार्ल्स: द प्रायव्हेट मॅन, द पब्लिक रोल’ या माहितीपटात कॅमिला पार्कर बॉल्ससोबतचे त्याचे अफेअर जाहीरपणे कबूल केले.डिसेंबर 1992 मध्ये दोघे वेगळे झाले होते. अनेकांचा असा विश्वास होता की डायना चार्ल्ससाठी योग्य पत्नी नाही. पण चार्ल्सची मुलाखत येताच ब्रिटनमधील बहुतांश लोक डायनाच्या बाजूने झाले. हे सर्व घडताना कोलमडून पडणे किंवा पुन्हा नव्याने आयुष्य जगण हे दोन पर्याय असताना प्रिन्सेस डायानाने दुसरा पर्याय निवडला. (वाचा :- G20 Summit: पंतप्रधान मोदींचा स्वदेशी कपड्यांमध्ये रॉयल थाट, जागतिक नेत्यांची घेतली भेट पाहा फोटो)

​3 वर्ष जुना ड्रेस

3-

हा ब्लॅक कॉकटेल ड्रेस डायनाने 1991 मध्ये म्हणजेच तीन वर्षांपूर्वी क्रिस्टीना स्टॅम्बोलियनकडून खरेदी केला होता. त्यावेळी तिला विश्वास होता की हा ड्रेस खूप बोल्ड आहे आणि तिला शोभणार नाही. पण बंधनातुन मुक्त होण्यासाठी तीने हा ड्रेस परिधान केला होता. त्यानंतर ‘प्रिन्सेस डायना रिव्हेंज ड्रेस’ या शीर्षकासह अनेक लेख प्रकाशित झाले होते. (वाचा :- बनारसी साडी, लिपस्टिक लावून 24 वर्षांच्या अँड्रिलाला जड अंतःकरणाने निरोप, पायाचे चुंबन घेताना बॉयफ्रेंडला अश्रू अनावर)

हेही वाचा :  'बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून..'; मनोहर जोशींच्या निधनावर राज ठाकरेंची भावनिक प्रतिक्रिया

​स्वत:ची ओळख

प्रिन्सेस डायना प्रिन्स चार्ल्सपासून विभक्त झाली होती आणि घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली होती. तिला माहित होते की तिला यापुढे राजघराण्याचा कठोर ड्रेस कोड पाळण्याची गरज नाही. तिला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची होती. या पार्टीनंतर, डायनाला बंडखोर म्हणून पाहिले गेले.

(वाचा :- राणी एलिझाबेथने मृत्यूनंतर ठेवले हिरेजडीत मौल्यवान दागिने मागे, शाही दागिन्यांची किंमत ऐकून तोंडात बोटं घालाल)

Source link