धक्कादायक! गोंदियात तब्बल 20 हजार मानसिक रुग्ण; हादरवणारी आकडेवारी समोर

धक्कादायक! गोंदियात तब्बल 20 हजार मानसिक रुग्ण; हादरवणारी आकडेवारी समोर


प्रविण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : गोंदिया (Gondia) जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोंदिया महिन्यात गेल्या पाच महिन्यात तब्बल 20 हजार मानसिक रूग्ण (mental disorders) आढळल्याने खळबळ उडाली आहे. झोप न येणे, निराश वाटणे, वैफल्य, कौटुंबिक तणाव, प्रेम प्रकरण व कर्जाचे डोंगर अशा विविध कारणाने तणावात असलेली व्यक्ती आत्महत्येचा मार्ग पत्करीत आहे. संयम न बाळगता धीर सोडणाऱ्या व्यक्तींना आत्महत्या हाच एकमेव मार्ग दिसत असतो. तणावात असलेली व्यक्ती परिस्थितीशी लढण्याचे धाडस सोडून आत्महत्येचा मार्ग पत्करत असते.

अशातच कोविडकाळात अनेकांचे मानसिक आरोग्य बिघडून गेले होते. अनेकजण कोविडच्या भीतीमुळे मनातून खचून गेले होते. मानसिक तणावात राहता राहता हजारो लोक मनोरुग्ण होऊ लागले आहेत. गोंदिया जिल्ह्यात अवघ्या पाच महिन्यांत तब्बल 20 हजार 281 लोकांना मानसिक आजार असल्याचा खळबळजनक आकडा पुढे आला आहे.

गोंदिया जिल्ह्यात आर्गेनिक मेंटल डिसिज, दारूमुळे मानसिक रोगी होणे, स्मृतिभ्रंश, भीती वाटणे, दूर्धर आजार, स्किझोफ्रेनिया, उदासीनता, व्यसनाधीनता, अकस्मार (मिरगी), गतिमंद, निद्रानाश आणि इतर अनेक प्रकारचे मानसिक आजार लोकांना होताना दिसत आहेत. गोंदिया जिल्ह्यात सन 2023 मधील एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांची परिस्थिती पाहता तब्बल 20 हजार 281 जण मानसिक रुग्ण असल्याची आकडेवारी पुढे आली आहे.

हेही वाचा :  रिद्धपुरात डॉ. आंबेडकरांच्या पुतळय़ाची विटंबना

कोरोनापासून ही आकडेवारी झपाट्याने वाढत आहे. याहूनही अधिक मानसिक रुग्ण असून, या रुग्णांच्या चार पट मानसिक रोगी जिल्ह्यात असल्याचे समजते. पाच महिन्यांतील मानसिक रोगी असल्याची आकडेवारी ही 20 हजारांवर असून ही फक्त शासकीय रुग्णालयातील आकडेवारी आहे. गोंदिया जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय व मेडिकल कॉलेजने 2061 रुग्णांवर उपचार केले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयाने 465 रुग्णांवर, मेडिकल कॉलेजच्या आयपीडीमध्ये 326, रुग्ण, तर जिल्ह्यातील 40 प्राथमिक आरोग्य केंद्रांतून 17 हजार 429 जणांवर मानसिक आजार असल्याचा उपचार सुरू आहे. अवघ्या पाच महिन्यांत 20 हजार 281 जणांना मानसिक आजार असल्याचे समोर आले आहे.



Source link