पाचगणीमध्ये ‘धुळी वावटळ’; निसर्गाचं रौद्ररुप दाखवणारा Video Viral | ‘Dust storm’ in Pachgani; Video Viral showing the nature of nature

पाचगणीमध्ये ‘धुळी वावटळ’; निसर्गाचं रौद्ररुप दाखवणारा Video Viral | ‘Dust storm’ in Pachgani; Video Viral showing the nature of nature



पाचगणीमध्ये ‘धुळी वावटळ’; निसर्गाचं रौद्ररुप दाखवणारा Video Viral | ‘Dust storm’ in Pachgani; Video Viral showing the nature of nature

शनिवारी दुपारी वेगात वारे आल्यानंतर वाऱ्याचा भोवरा तयार होऊन मातीची जोरदार वावटळ उठली.

पाचगणीच्या टेबल लँड वर अचानक धुळी वावटळ तयार झाल्यामुळे पर्यटकांना निसर्गाचा अनोखा नजारा अनुभवास आला. थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या पाचगणीच्या टेबललॅन्डवर शनिवार रविवारच्या सुट्टीच्या अनुषंगाने पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती आहे. शनिवारी दुपारी वेगात वारे आल्यानंतर वाऱ्याचा भोवरा तयार होऊन मातीची जोरदार वावटळ उठली. अशा वावटळीनी अनेकदा मोठे नुकसान होते आणि या वावटळीत माणूस सापडला तर त्याला इजाही पोहचू शकते. यामध्ये टेबल लँडच्या परिसरातील दुकानांचे छत उडाले. चक्री वावटळ बघून पर्यटक तसेच स्थानिक व्यावसायिक भयभीत आणि अवाक झाले होते.

धुळी वावटळीमध्ये नक्की काय होत?

धुळी वावटळीने मोठ्या प्रमाणात वाळू एका ठिकाणाहून दुसरीकडे नेली जाते अशा प्रदेशातील भूपृष्ठ सौर प्रारणामुळे बरेच तापत असल्यामुळे न्यूनदाब जास्त तीव्र असतो, तसेच ऊर्ध्व गती आणि चक्राकार गती दोन्ही जास्त तीव्र असतात. त्यामुळे धुळी वावटळ १ किमी. उंचीपर्यंत पोहोचू शकते. वावटळीची पुढे सरकण्याची गती ताशी ५ ते १० किमी. एवढी कमी पण कधीकधी ती ताशी ५० किमी. किंवा त्यापेक्षा जास्त असते. वावटळी साधारणपणे उन्हाळ्यात दुपारी अथवा संध्याकाळी निर्माण होतात. वावटळीत धूळ उधळली जाते तेव्हा दृश्यमानता बरीच कमी होते. याशिवाय वावटळीत हवामानाचा कोणताही उपद्रवी आविष्कार निर्माण होत नाही.

हेही वाचा :  'आता दगडींच्या बदल्यात हा निलेश राणे....' गुहागरच्या सभेत भास्कर जाधवांना खुले आव्हान

(हे ही वाचा: ‘पुष्पा’मधील ‘सामी सामी’ गाण्यावर चक्क हत्तीने धरला ठेका!; Video Viral)

(हे ही वाचा: जंगलाचा राजा सिंहाची म्हशींनी केली दयनीय अवस्था! बघा Viral Video)

चक्रीय वा चक्राकार गती असलेल्या वाऱ्याच्या लहान वादळास वावटळ असे म्हणतात. जमिनीचे एखादे लहान क्षेत्र सौर प्रारणामुळे (तरंगरूपी ऊर्जेने) खूप तापले म्हणजे त्या क्षेत्रावर न्यूनदाब (कमी दाबाचे क्षेत्र) निर्माण होतो व संनयन (अभिसरण) सुरू होऊन हवेस घूर्णता (चक्राकार गती) प्राप्त होते. ह्या न्यूनदाबाभोवती हवा चक्राकार फिरते. न्यूनदाब क्षेत्रावर हवेचे अभिसारण होते (सर्व बाजूंनी हवा एका स्थानाकडे येते). या आविष्कारात हवेच्या स्तंभात चक्राकार तसेच ऊर्ध्व (वरच्या दिशेत) गती असते आणि हा स्तंभ सरकतो. वावटळीच्या केंद्रीय भागात हवेचा दाब न्यूनतम असतो. उष्ण कटिबंधी महासागरावरील काही जलशुंडा अशाच रीतीने निर्माण होतात.



Source link