वाचा: ‘या’ प्लान्समध्ये २०० रुपयांपेक्षा कमीमध्ये मिळतात ५६ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह हे बेनिफिट्स
जर गरज असेल आणि महाग स्मार्टफोन असेल तर तुम्ही चार्जर देखील घेऊ शकता जेणेकरून बॉक्समधील सर्व गोष्टी पूर्ण होतील. यांनतर तुम्ही अशाच वेबसाइटवर क्लिक करून तुमच्या स्मार्टफोनची चांगली छायाचित्रे अपलोड करू शकता . OLX सारख्या वेबसाइटवर, ऍड पोस्ट विनामूल्य आहे. परंतु, तुम्हाला फीचर्ड पोस्ट आणि बूस्ट पोस्टसाठी पैसे द्यावे लागतील. पोस्ट बूस्ट करून फिचर्ड एरियात ठेवल्यास तुम्हाला ग्राहक जलद मिळतील आणि तुम्ही तुमच्या फोनची किंमत तुमच्यानुसार ठरवू शकाल. फोनची किंमत एक्सचेंज ऑफरमध्ये ठेवू नका. या पद्धतीशिवाय, आणखी एक मार्ग म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना विचारणे. जर खरेदीदार सापडला नाही. तर, तुम्ही जवळच्या स्मार्टफोन शॉपला भेट देऊन खरेदीदार शोधू शकता. साधारणपणे प्रत्येक शहरात असे काही बाजार असतात जिथे जुने फोन विकले जातात.
त्या मार्केटमध्ये तुमचे फोन योग्य किमतीत विकले जातील. फोन विकण्यापूर्वी फोन योग्य रिसेट करायला विसरू नका. पर्सनल ऍड पोस्ट वेबसाइट्स व्यतिरिक्त, कॅशिफाय सारख्या वेबसाइट्स देखील आहेत. या वेबसाइटवर जा आणि तुमचा फोनचे सर्व डिटेल्स टाका. यानंतर तुम्हाला फोनची किंमत सांगितली जाईल. जर तुम्हाला किमत आवडली तर खरेदीदार तुमच्या घरी कोणालातरी पाठवून फोन मागवून घेतील. आणि तुम्हाला तुमचे पैसे देतील. कधी-कधी Amazon किंवा Flipkart व्हाउचर देखील या वेबसाइट्सवर उपलब्ध असतात. व्हाउचरसह पर्याय निवडल्यावर, तुम्हाला सामान्य दरापेक्षा थोडा जास्त दर मिळेल.
वाचा: ‘या’ प्लान्समध्ये २०० रुपयांपेक्षा कमीमध्ये मिळतात ५६ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह हे बेनिफिट्स
वाचा: १ Gbps स्पीड आणि ओटीटी बेनिफिट्ससह येणारे ‘हे’ स्वस्त ब्रॉडबँड प्लान्स पाहून लगेच कराल नेटवर्क स्विच, पाहा डिटेल्स
वाचा: Infinix Zero 5G चा पहिला सेल आज, फक्त १ रुपयांत मिळणार ९९९ रुपये किमतीचा ईयरफोन, पाहा डिटेल्स