रशिया-युक्रेन युद्ध भारतच थांबवू शकतो; पुतीननंतर आता इटलीच्या PM मेलोनी यांनाही विश्वास

रशिया-युक्रेन युद्ध भारतच थांबवू शकतो; पुतीननंतर आता इटलीच्या PM मेलोनी यांनाही विश्वास


Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्ध गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. अद्यापही हे युद्ध शमले नाहीये. अलीकडेच रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनीही या प्रकरणात भारताची भूमिका महत्त्वाची आहे, असं म्हटलं होतं. त्यानंतर आता इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनीदेखील भारत युक्रेन-रशिया युद्ध थांबवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतो, असं म्हटलं आहे. मेलोनी यांनी शनिवारी सेर्नोबियोच्या एम्ब्रोसेटी फोरममध्ये संबोधित केले होते. तेव्हा त्यांनी ही टिप्पणी केली आहे. ज्यावेळीस मेलोनी यांनी ही टिप्पणी केली तेव्हा युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेंस्की हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मेलोनी आणि झेलेंस्की यांच्यात भेट झाली होती. 

जॉर्जियो मेलोनी यांनी म्हटलं आहे की, आंतराराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन झाल्यास संघर्ष व संकट आणखी वाढतील, हे स्पष्टच आहे. मात्र, संकट वाढल्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसतो. आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन आणि इकोनॉमिक ग्लोबलायझेशन एकत्र नाही येऊ शकत. माझा विश्वास आहे की हा मुद्दा सोडवण्यासाठी चीन आणि भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात आणि त्यांनी ही भूमिका निभावली पाहिजे, असं जॉर्जिया मेलोनी यांनी म्हटलं आहे. मेलोनी यांनी म्हटलं आहे की, इटलीसाठी युक्रेनला पाठिंबा देण्याची निवड ही राष्ट्रीय हिताची पहिली आणि प्रमुख निवड आहे आणि ही निवड बदलणार नाही.

हेही वाचा :  ICC World Cup, IND vs BAN : भारतीय महिलांसमोर बांग्लादेशचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?

दोन दिवसांपूर्वी व्लादिमीर पुतीन यांनीदेखील भारत या संकटावर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतो. व्लादिवोस्तोक येथील ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये बोलताना पुतिन यांनी म्हटलं होतं की, स्तंबूल चर्चेदरम्यान ज्या तडजोडींवर सहमती झाली आणि ज्यांची अंमलबजावणी होऊ शकली नाही ती भविष्यातील शांतता चर्चेचा आधार बनू शकतात. पुतिन यांनी भारतासह युक्रेन संघर्षावर त्यांच्या संपर्कात असलेल्या तीन देशांची नावं सांगितली. तसंच, ते हे संकट सोडवण्यास ईमानदारीने प्रयत्न करु शकतात, असं म्हटलं आहे. 

‘आम्ही त्यांच्याशी (युक्रेन) चर्चा करण्यास तयार आहोत का? तसे करण्यास आम्ही कधीही नकार दिला नाही. परंतु ही चर्चा काही अल्प-मुदतीच्या मागण्यांवर आधारित नसून, इस्तंबूलमध्ये मान्य झालेल्या आणि प्रत्यक्षात सुरू झालेल्या कागदपत्रांच्या आधारे होणार आहे’. याव्यतिरिक्त, पुतिन यांनी म्हटलं आहे की, ‘चीन, भारत आणि ब्राझील युक्रेनशी संबंधित भविष्यातील शांतता चर्चेत मध्यस्थ म्हणून काम करू शकतात.’ दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट रोजी युक्रेनच्या दौऱ्यावर असताना त्यांनी झेलेंस्की यांना रशियासोबतच्या बैठकीत सहभागी होण्याचा आग्रह केला होता. तसंच, दोन्ही देशातील युद्ध संपवण्याचा सल्ला दिला होता. 

हेही वाचा :  भीषण स्फोटानंतर घराच्या अक्षरश: चिंधड्या, कॅमेऱ्यात कैद झाला आगीचा गोळा; 5 जण जागीच ठार



Source link