IIT JEE Main:‘आयआयटी जेईई मेन’ लांबणार का?

IIT JEE Main:‘आयआयटी जेईई मेन’ लांबणार का?


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

या महिन्याच्या अखेरीस नियोजित असलेली आयआयटी-जेईई मेन्स-२०२३ ही प्रवेश परीक्षा लांबणीवर पडणार की नाही, हे आता मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीवर अवलंबून आहे. ‘वेगवेगळ्या परीक्षा मंडळांच्या १२वीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षा तोंडावर असताना, त्यांच्या प्रॅक्टिकल व व्हायवा होणार असतानाच नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) ही प्रवेश परीक्षा २४ ते ३१ जानेवारी २०२३ यादरम्यान होतील, असे १५ डिसेंबर २०२२च्या अधिसूचनेद्वारे अचानक जाहीर केले’, असा आक्षेप नोंदवत शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्या अनुभा सहाय यांनी जनहित याचिका केली आहे. त्यावर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने १० जानेवारीला सुनावणी ठेवली आहे.

सहाय यांनी या प्रवेश परीक्षेबाबतच्या नियमांना याचिकेत आव्हान दिले असताना परीक्षेची नियमावलीच जोडलेली नाही, हे पाहून खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले. तसेच नियमावली तपासल्याविना न्यायालय सुनावणी कशी घेणार? अशी विचारणाही त्यांच्यासमोर केली. त्यानंतर नियमावली न्यायालयासमोर ठेवण्यासाठी मुदत देण्याची विनंती सहाय यांनी केल्याने खंडपीठाने हा विषय १० जानेवारीला सुनावणीस ठेवला.

JEE Mains:’जेईई मेन्स’च्या अर्जासाठी १२ जानेवारीपर्यंत मुदत
‘प्रवेश परीक्षेच्या अधिसूचनेने तुम्ही कसे बाधित होत आहात‌? तुमचे पाल्य ही परीक्षा देणार आहे का?’, अशी विचारणा खंडपीठाने सुनावणीदरम्यान सहाय यांना केली. त्यावर सहाय यांनी नकारार्थी उत्तर दिले. मात्र, ‘दरवर्षी एनटीएकडून चार महिने आधी प्रवेशपरीक्षेच्या तारखा घोषित होतात. यावेळी विद्यार्थ्यांना अत्यंत कमी वेळ देऊन ही परीक्षा जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा :  JEE Main 2022: जेईई मेन पहिल्या टप्प्याच्या तारखांमध्ये बदल

विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल, व्हायवा होणार असताना आणि बोर्ड परीक्षाही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार असताना ही प्रवेश परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा अवधीच मिळणार नाही. त्यामुळे प्रवेश परीक्षा एप्रिलपर्यंत पुढे ढकलायला हवी’, असे म्हणणे सहाय यांनी मांडले. तसेच ‘प्रवेश परीक्षेच्या पात्रतेसाठी ७५ टक्के गुणांची अट नव्याने घालण्यात आली आहे.

त्यामुळे त्याबद्दलही १२वीची परीक्षा देणार असलेल्या विद्यार्थ्यांना पुरेसा अवधी दिलेला नाही’, असे म्हणणे याचिकेत मांडण्यात आले आहे. परंतु, ‘७५ टक्के गुणांची अट ही प्रवेश परीक्षेसाठी नसून प्रवेशाच्या संदर्भात असल्याने याचिकेत त्या मुद्द्यावर दिशाभूल करण्यात आली आहे’, असे स्पष्टीकरण ‘एनटीए’तर्फे अॅड. रुई रॉड्रिग्ज यांनी न्यायालयात केले.

NET Exam:‘नेट’साठी २१ फेब्रुवारीपासून परीक्षा
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Source link