किडनी सडल्यास रक्तातील घाण बाहेर काढायला करावी लागते ही वेदनादायी प्रक्रिया, करा हा उपाय

किडनी सडल्यास रक्तातील घाण बाहेर काढायला करावी लागते ही वेदनादायी प्रक्रिया, करा हा उपाय


World Kidney Day 2023 :- Kidney अर्थात मूत्रपिंड आपल्या रक्तातील विषारी आणि टाकाऊ पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. यासोबतच, ते आपल्या शरीरातील पाण्याचे संतुलन देखील नियंत्रित करते आणि लघवीच्या स्वरूपात अतिरिक्त द्रव काढून टाकते. शरीरातील घाण फिल्टर करण्यासोबतच किडनी विविध हार्मोन्स देखील तयार करतात, जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात. डायलिसिसबद्दल तुम्ही देखील ऐकले असेल. पण डायलिसिस कधी आवश्यक असते हे माहित आहे का?

नोएडा येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या नेफ्रोलॉजी विभागाचे एडिशनल डायरेक्टर Dr. Anunja Porwal यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा दोन्ही किडनी 10 टक्के जरी कमी काम करू लागली तरी शरीरातील जास्तीचे पाणी आणि विषारी पदार्थ योग्य प्रकारे काढून टाकू शकत नाहीत. या स्थितीला एंड स्टेज किडनी डिसीज किंवा किडनी फेल्युअर (End Stage Kidney Disease or Kidney Failure) म्हणतात आणि यावेळीच रुग्णाला डायलिसिसची गरज सुरू होते. (फोटो सौजन्य :- iStock)

90% पेक्षा अधिक किडनी खराब होण्याची लक्षणे

90-

मळमळ, उलट्या, भूक न लागणे, सूज, थकवा, लघवीची कमतरता किंवा लघवी नसणे, खाज सुटणे, वजन कमी होणे यासारखी लक्षणे किडनीला गंभीर नुकसान झाल्यास दिसू लागतात. तथापि, काही रुग्णांमध्ये अशी कोणतीही लक्षणे न दिसत सुद्धा उच्च पातळीचे विषारी आणि टाकाऊ पदार्थ असू शकतात. नेफ्रोलॉजिस्टच्या सल्ल्याने योग्य वेळी डायलिसिस सुरू करावे. डायलिसिसचे दोन प्रकार आहेत – हेमोडायलिसिस आणि पेरिटोनियल डायलिसिस. ज्यापैकी हेमोडायलिसिस सर्वात सामान्य आहे आणि याबद्दल अनेकांना माहिती असते.
(वाचा :- World Kidney Day: किडनी खराब झाल्यास दिसतात ही 8 लक्षणं, लघवीत जळजळ, फेसाळपणा, फिकट रंग दिसल्यास करा हे 4 उपाय)​

हेही वाचा :  टाचांना पडलेल्या भेगांमुळे त्रस्त आहात? या 3 गोष्टींनी 7 दिवसात मिळवा मुलायम टाचा

हेमोडायलिसिस म्हणजे काय?

हेमोडायलिसिस म्हणजे काय?

​हेमोडायलिसिस ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये डायलिसीस मशिनद्वारे डायलायझर नावाच्या विशेष फिल्टरसह रुग्णाचे रक्त स्वच्छ केले जाते. डायलायझरमध्ये गलिच्छ रक्त जाण्यासाठी मार्ग तयार करण्यासाठी रुग्णाच्या हातात एक छोटी शस्त्रक्रिया केली जाते. याला आर्टेरिओ वेनस फिस्टुला म्हणतात. आपत्कालीन परिस्थितीत, रुग्णाच्या हातात फिस्टुला नसल्यास, मुख्य नसांपैकी एकामध्ये शिरासंबंधी कॅथेटर टाकून डायलिसिस केले जाते.
(वाचा :- H3N2 Virus Cough Fever Home Remedies : नव्या व्हायरसचं जगावर सावट, ताप व खोकला सुरू होताच करा हे 8 घरगुती उपाय)​

डायलिसिस कसे होते?

डायलिसिस कसे होते?

डायलायझर किंवा फिल्टरचे दोन भाग असतात. एक भाग रुग्णाच्या रक्तासाठी आणि दुसरा द्रव स्वच्छ करण्यासाठी! एक पातळ पडदा हे दोन भाग वेगळे करतो. रक्तपेशी, प्रथिने आणि इतर महत्त्वाचे पदार्थ रुग्णाच्या रक्तात राहतात कारण ते पडद्यामधून जाण्यासाठी खूप मोठे असतात. रक्तातील लहान टाकाऊ पदार्थ जसे की युरिया, क्रिएटिनिन, पोटॅशियम आणि अतिरिक्त द्रवपदार्थ निघून जातात आणि रक्तातून काढून टाकले जातात.
(वाचा :- International Women’s Day वयाच्या 30 आधीच खायला घ्या हे Vitamins व Mineral, नाहीतर येईल अंथरूणात खिळण्याची वेळ)​

हेही वाचा :  थंडीत स्तनपान करणाऱ्या मातेला दूध येत नाही, या सोप्या टिप्सने आईचं दुखणं आणि मुलाची भूक करा कमी

कितीवेळा करायचे असते डायलिसिस?

कितीवेळा करायचे असते डायलिसिस?

हेमोडायलिसिस साधारणपणे आठवड्यातून 3 वेळा केले जाते, जे सुमारे 4 तास टिकते. कोणत्या रुग्णासाठी आठवड्यातून किती वेळा डायलिसिस करावे लागेल, हे नेफ्रोलॉजिस्टशी चर्चा केल्यानंतरच कळू शकते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की पुरेसे डायलिसिस केल्याने रुग्णाचे एकूण आरोग्य सुधारते आणि त्यांना दीर्घकाळ जगण्यास मदत होते.
(वाचा :- सुष्मिता सेनच्या नसांमध्ये 95% ब्लॉकेज, Artery Blockage दाखवते ही 8 भयंकर लक्षणं, बंद नसा उघडण्यासाठी 10 उपाय)​

डायलिसिसपासून वाचण्यासाठी उपाय

डायलिसिसपासून वाचण्यासाठी उपाय

डायलिसिस टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मूत्रपिंड निरोगी ठेवणे. त्यासाठी रक्तदाब, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवावी आणि पुरेसा व्यायाम कराव आणि पाणी प्यावे. त्याचबरोबर किडनीला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टींचे सेवन करू नये.
(वाचा :- Hepatitis B Symptoms भणक लागू न देता हेपेटायटिस बी करतं Liver कायमचं फेल, चुकूनही करू नका ही लक्षणं दुर्लक्षित)
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link