या विद्यार्थिनींवर प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी साधारण १० मुलींविरुद्ध आयपीसीच्या कलम १४३,१४५,१८८ आणि १४९ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल एफआयआर नोंदविला आहे.
बंदी असतानाही आंदोलन
हिजाबच्या वादाबाबत कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी अद्याप प्रलंबित असून अंतरिम आदेशानुसार विद्यार्थ्यांना वर्गात हिजाब, बुरखा आणि भगवी शाल ही धार्मिक वस्त्र परिधान करुन येण्यास मनाई आहे. असे असूनही अनेक मुली सतत हिजाब घालण्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी ज्युनिअर कॉलेजच्याबाहेर आंदोलन करत निषेध आणि घोषणाबाजी केली.
हायकोर्टात युक्तिवाद
हिजाब ही इस्लामची अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही किंवा ते अनिवार्य देखील नाही. त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये त्याचा वापर करण्यापासून रोखणे हे संविधानाच्या कलम २५५ चे उल्लंघन ठरत नाही, असा युक्तीवाद राज्य सरकारच्या बाजूने करण्यात आला. तर हिजाबवर बंदी म्हणजे पवित्र कुराणवर बंदी घालण्यासारखे असल्याचे मुस्लिम मुलींची बाजू मांडणारे वकील विनोद कुलकर्णी यांनी याचिकेत म्हटले.
अल्पसंख्याक विभागाचे परिपत्रक
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार शाळा-महाविद्यालयीन कॅम्पसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे हिजाब, बुरखा आणि भगवी शाल इत्यादी धार्मिक कपडे बाहेर उतरवावेत. यामध्ये विद्यार्थ्यांसोबत शिक्षक वर्गालादेखील हा नियम लागू आहे. हिजाब बंदीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालय अंतिम निर्णय देईपर्यंत उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश लागू राहणार आहे. दरम्यान १७ फेब्रुवारी रोजी राज्य अल्पसंख्याक कल्याण विभागाने वर्गात हिजाबसह धार्मिक कपडे आणि प्रतिके परिधान करण्यास बंदी घातली आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या
