डोंबिवली स्थानकात जोडप्याचा किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल; नेटिझन्सने व्यक्त केली नाराजी | couple spotted kissing at dombivli and csmt platform commuters approach police

डोंबिवली स्थानकात जोडप्याचा किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल; नेटिझन्सने व्यक्त केली नाराजी | couple spotted kissing at dombivli and csmt platform commuters approach police



डोंबिवली स्थानकात जोडप्याचा किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल; नेटिझन्सने व्यक्त केली नाराजी | couple spotted kissing at dombivli and csmt platform commuters approach police

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आपण सोशल मीडियावर अनेक कपल्सचे रोमॅन्टिक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना पाहतो. पण यावेळी सोशल मीडियावर चक्क किस करतानाचे दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यात हे कपल दोन वेगळ्या स्टेशवर सार्वजनिक ठिकाणी किस करताना दिसत आहेत. ही गोष्ट सार्वजनिक ठिकाणी घडली असो वा नसो, पण सोशल मीडियावर सध्या हा चर्चेचा विषय ठरला आहे.

‘मिड-डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, “मध्य रेल्वेच्या डोंबिवली आणि सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) या दोन स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरचे हे व्हिडीओ आहेत. एक व्हिडिओ डोंबिवलीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर एका प्रवाशाने काढला आहे. तर दुसरा व्हिडीओ हा सीएसएमटी प्लॅटफॉर्मवर ट्रेन उभी असताना ट्रेनमधून एका प्रवाशाने काढला होता.

पहिला व्हिडीओ हा सीएसएमटी स्टेशनवरचा आहे. तर नंतरता व्हिडीओ हा डोबिंवली स्टेशनवरचा आहे. या दुसऱ्या व्हिडीओत हे कपल प्लॅटफॉर्मवर असताना किस करतानाचा आहे. डोंबिवली स्टेशन प्लॅटफॉर्मवर क्रमांक ५ वर घडलेल्या या घटनेबद्दल अधिक माहिती दिली आहे. रेल्वे कॅन्टीनमध्ये काम करणार्‍या एका व्यक्तीने सांगितले की ” या कपलवर काही प्रवासी संतापले होते, हे कपल कॉलेजमध्ये असल्याचे आम्हाला वाटते. जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा कळलं की हे कपलं सार्वजनिक ठिकाणी किस करत आहेत आणि काही प्रवाशांनी याला विरोध केला तेव्हा ते तेथून निघून गेले.

हेही वाचा :  Viral Video : गुपचूप तिसरं लग्न करत असताना लग्न मंडपात पहिल्या बायकोची एन्ट्री अन् मग...

तर या कपलचा सीएसएमटी स्टेशनवरही विरोध करण्यात आला होता. एका प्रवाशाने त्यांचा विरोध केला होता. या विषयी तो प्रवासी म्हणाला, “आजच्या पिढीला काय म्हणावे? लाज वगैरे काही नाही. सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य पाहून इतरांना लाज वाटते, पण ते त्याचा आनंद घेतात. आई-वडील त्यांचं मुलं काही करत असल्याचा विचार करू शकत नाही.”

डोंबिवली सरकारी रेल्वे पोलीस अधिकारी अनिल शेळके यांनी मिड-डेला सांगितले की, “आम्ही व्हिडिओ देखील पाहिला आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी करणे चुकीचे आहे. आम्ही एनसी नोंदवली आहे आणि सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तणूक केल्याबद्दल पुढील तपास करत आहोत. ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे सीसीटीव्ही कॅमेरा कव्हरेज नसल्याने आम्हाला फुटेज मिळू शकले नाही.”



Source link