महापालिकेच्या अग्निशामक आणि आरोग्य विभागात बंपर भरती

महापालिकेच्या अग्निशामक आणि आरोग्य विभागात बंपर भरती


म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील पाच वर्षांपासूनच्या प्रलंबित नोकरभरतीचा अखेर श्रीगणेशा होणार आहे. महापालिकेतील अग्निशामक विभागातील ३४८, तसेच आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा एकूण ७०६ पदांसाठीच्या भरतीची प्रक्रिया १५ दिवसांच्या आत सुरू केली जाणार आहे. या पदासाठीची सेवाप्रवेश नियमावलीस नगरविकास विभागाने आधीच मंजुरी दिली आहे.

राज्य सरकारने या भरतीसाठी टीसीएस, तसेच आयबीपीपीएस या दोन कंपन्यांपैकी एका कंपनीकडून भरती करण्यास हिरवा कंदील दर्शवला आहे. यासोबतच उर्वरित दोन हजार पदासांठी नगरविकास विभागात प्रलंबित सेवा प्रवेश नियमावलीबाबत पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला दिले आहेत. त्यामुळे महापालिकेत आता नोकरभरतीचा बिगुल वाजला आहे.

नाशिक शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेला मनुष्यबळाची गरज असताना गेल्या चोवीस वर्षांपासून महापालिकेत नोकरभरती झालेली नाही. महापालिकेत ‘क’ वर्ग संवर्गातील मंजूर पदांची संख्या ७,०८२ इतकी असताना नियत वयोमानानुसार निवृत्त, स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेतील रिक्त पदांची संख्या २,६०० वर गेली आहे.

महापालिकेत सद्य:स्थितीत जेमतेम ४,५०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. परिणामी, नागरी सुविधा पुरविताना उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण पडू लागला आहे. सरकारच्या ३५ टक्के आस्थापना खर्चाची मर्यादा नोकरभरतीला अडचणीची ठरत आहे. मात्र, करोनाच्या काळात अत्यावश्यक गरज म्हणून नगरविकास विभागाने सुधारित आकृतिबंधातील आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन आदी विभागांतील ८७५ नवीन पदांना नगरविकास विभागाकडे मंजुरी दिली होती. मात्र, २०१७ पासून महापालिकेची सेवाप्रवेश नियमावलीची फाइल मंत्रालयात मंजुरीअभावी पडून असल्याने ही भरती अडकली होती.

हेही वाचा :  मुंबई विद्यापीठ आयडॉलचे जानेवारी सत्राचे प्रवेश सुरू

अखेरीस नगरविकास विभागाने अग्निशामक विभागातील ३४८ पदे आणि आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांसाठीची सेवाप्रवेश नियमावली मंजुर केली होती. त्यामुळे नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला होता. राज्य सरकारने या पदांची भरती कोणत्या संस्थेमार्फत करावी, या संदर्भातील निर्देश दिले नव्हते. त्यानंतर सरकारने राज्यातील सर्व भरतीप्रक्रिया आयबीपीपीएस किंवा टीसीएसमार्फत करण्याचा निर्णय घेतला असून, त्या संदर्भातील पत्र महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले आहे.

टीसीएस किंवा आयबीपीपीएसमार्फत भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब , क, ड या संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरताना स्पर्धापरीक्षा प्रक्रिया टीसीएस (टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस), आयबीपीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनीमार्फत राबविण्याबाबत शासननिर्णय निर्गमित केलेला आहे. हा आदेश मंग‌ळवारी (दि. २३) महापालिकेला प्राप्त झाला आहे. त्यामुळे महापालिका या ७०६ पदांसाठीच्या नोकरभरतीसाठी या दोन संस्थांपैकी एका संस्थेची निवड करणार आहे.

SBI मध्ये परीक्षा न देता मिळेल नोकरी, ७८ हजारपर्यंत पगार

दोन हजार पदांसाठीही भरतीप्रक्रिया

सद्य:स्थितीत ७०६ पदांची भरतीप्रक्रिया सुरू केली जाणार असून, उर्वरित दोन हजार पदांसाठीही प्रलंबित असलेल्या सेवाप्रवेश नियमावलीबाबत तत्काळ निर्णय घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाला दिले आहेत. या संदर्भात १५ दिवसांची डेडलाइन देण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित दोन हजार पदांच्या भरती प्रक्रियेलाही गती येणार असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा :  बायोडेटा रेडी ठेवा! आरोग्य विभागात उद्यापासून 11000 पदांची मेगा भरती; आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांची मोठी घोषणा

महापालिका क्षेत्रातील रिक्त पदे सरळसेवेने भरताना स्पर्धापरीक्षा प्रक्रिया टीसीएस, आयबीपीपीएस या कंपन्यांमार्फत राबविण्याबाबत शासननिर्णय निर्गमित होऊन तो महापालिकेला प्राप्त झाला आहे. या शासननिर्णयाच्या अनुषंगाने व आयुक्तांच्या निर्देशानुसार नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यात येईल.

– मनोज घोडे पाटील, उपायुक्त प्रशासन

राज्याच्या ग्रामविकास विभागाअंतर्गत बंपर भरती
Government Job: राज्यात १५ विद्यापीठांतील रिक्त पदे भरणार

Source link