ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीपूर्वी विराट पोहोचला ऋषीकेशला, पत्नी अनुष्कासोबत घेतलं दर्शन

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीपूर्वी विराट पोहोचला ऋषीकेशला, पत्नी अनुष्कासोबत घेतलं दर्शन


Virat Kohli and Anushka Sharma : भारतीय क्रिकेटपटू (Team india) सध्या विविध मंदिरात जात असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर असे युवा खेळाडू आधी पद्मनाभस्वामी मंदिरात त्यानंतर बाबा महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते. नुकतंच माजी कर्णधार कॅप्टन कूल एमएस धोनी (MS Dhoni) याचा झारखंडच्या प्रसिद्ध माँ देवरी मंदिरातील (Dewri Maa Temple) दर्शन घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता स्टार फलंदाज विराट कोहलीचाही (Virat Kohli) ऋषीकेश मंदिरातील (Rishikesh Temple) व्हिडीओ व्हायरल होत आहे. विराट पत्नी अनुष्कासोबत (Anushka and Virat) दर्शनासाठी पोहोचला असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेपूर्वी त्यानं दर्शन घेतलं आहे.

या व्हिडीओमध्ये विराट आणि अनुष्का संपूर्ण मंदिरात फेरी मारताना दिसत असून तेथील सांधू-संताचं दर्शन घेत आहेत. दोघेही अगदी सिंपल लूकमध्ये दिसत असून अनुष्काने ट्रॅडिशनल कपड्यांसह शाल वैगेरे ओढली आहे. यावेळी मंदिरात नेहमीप्रमाणे बरेच भाविक आले असून काही जणांनी विराटसोबत फोटो देखील क्लिक केले. हे सर्व फोटो सोशल मीडियावर पोस्ट होताना दिसत आहेत. 

हेही वाचा :  Jaydev Unadkat : 12 वर्षानंतर जयदवेला कसोटी संघात स्थान, मैदानात उतरताच केला अनोखा विक्रम

पाहा विराट-अनुष्काचा दर्शन घेतानाचा VIDEO-

याशिवाय विराटनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानं आता कांगारुचं काही खरं नाही, विराट आणखी दमदार फॉर्मात परतणार आणि शतकं ठोकणार असे मजेशीर कमेंट्स करत अनेक मीम्सही नेटकरी शेअर करत आहेत. यातील काही मीम्स पाहू….

73 शतकं केली पूर्ण

विराट कोहलीनं नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धडाकेबाज खेळी केली. या सामन्यात त्याने 110 चेंडूत 166* धावा केल्या. त्यानं हे शतक ठोकत आपली 73 आंतरराष्ट्रीय शतकं पूर्ण केली असून त्याचं हे 46 व एकदिवसीय शतक होतं. त्याच्या खेळीत एकूण 13 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 150.91 होता. कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत दोन शतकं झळकावली. गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले होते.  

हेही वाचा :  ICC क्रमवारीत सूर्यादादाचाच बोलबाला; इतिहास रचण्यापासून फक्त काही पावलं दूर

हे देखील वाचा-



Source link