Bear Grylls पावला! जिवंत ज्वालामुखीच्या तोंडाशी असतानाही दोन सख्ख्या भावांचा जीव वाचला; आईनं सांगितला थरार…

Bear Grylls पावला! जिवंत ज्वालामुखीच्या तोंडाशी असतानाही दोन सख्ख्या भावांचा जीव वाचला; आईनं सांगितला थरार…


Trending News : तुम्हाला बेअर ग्रिल्स माहितीये का? वाळवंटांपासून वर्षावनांपर्यंत आणि ज्वालामुखीमुळं तयार झालेल्या भूमीपासून चिखल, मातीपर्यंत जिथंजिथं सामान्यांना आव्हानं दिसली, जगण्याचा संघर्ष दिसला तिथंतिथं या माणसानं प्रवेश केला आणि या कठीण परिस्थितीमध्येही ‘जिंदगी जिंदाबाद’ असाच काहीसा अविर्भाव ठेवत त्यानं गेल्या अनेक वर्षांपासून अविश्वसनीय असे Survival Skills शिकवले. याच बेअर ग्रिल्सच्या व्हिडिओंनी एक काळ गाजवला. इतकंच नव्हे, तर आजही त्याचे व्हिडीओ तिकतकेच लोकप्रिय असून, सध्या त्यामुळं दोन तरुणांचा जीव वाचला आहे. 

बेअर ग्रिल्सनं तारलं… 

जगभरात चर्चा असणाऱ्या काही मुद्द्यांमध्ये हा एक विषय नजरा वळवत आहे. ब्रिटीश सेलिव्हिजन सादरकर्त्या कॅथरिन फोर्स्टर यांची दोन मुलं बालीमधील एका जिवंत ज्वालामुखीच्या तोंडापासून अडकून पडली होती. तिथं जवळपास 30 तासांपर्यंत त्यांच्याशी कोणाचाही संपर्क झाला नव्हता. अशा परिस्थितीमध्ये या दोघांच्याही हाकेला बेअर ग्रिल्स धावला. 

सतत त्याचे शो पाहणं एका अर्थी कॅथरिन यांच्यचा मॅटेन (22) आणि अँड्र्यू (18) या दोन्ही मुलाना फळलं असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. फोर्स्टर या युकेमध्ये पार पडणाऱ्या निवडणुकांवर लक्ष ठेवणार होत्या, पण मुलांना धोक्यात पाहून त्यांना कामावर लक्ष देता आलं नाही. (मागील आठवड्यात) बुधवारी ब्रिटीश भावंडांची ही जोडी जिवंत ज्वालामुखीच्या मुखापाशी अडकून पडली. जवळपास 9 आठवड्यांची दक्षिण आशियायी सफर संपवून ही दोघं मायदेशी परतणं अपेक्षित होतं. पण, प्रत्यक्षात मात्र ते 10000 फूटांच्या उंचीवर जगण्यासाठी संघर्ष करताना दिसले. 

हेही वाचा :  डिलिव्हरीनंतर कसे स्वतःला जपायला हवे याची माहिती

अतिशय धोकादायक स्थितीमध्ये या दोन्ही भावंडांनी बेअर ग्रिल्सच्या शोमधून पाहिल्यालेल्या आणि लक्षात राहिलेल्या गोष्टींचा जाणीवपूर्वक अवलंब केला. पावसाचं पाणी साठवण्यापासून तात्पुरता निवारा तयार करण्यापर्यंतच्या कृतीमध्ये त्यांना बेअरची मोठी मदत झाली. साथ होती ती म्हणजे स्काऊटच्या प्रशिक्षणातून मिळालेल्या थोड्याथोडच्या ज्ञानाची. 

आईला संकटाची कुणकुण लागली… 

आपली मुलं धोक्यात असल्याची कुणकुण कॅथरिनला लागली होती. ज्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधता येत नसल्याचं पाहून या शंकेला आणखी वाव मिळाला. साधारण 3000 मीटरच्या उंचीवर असणाऱ्या माऊंट अगुंग या ज्वालामुखीपाशी पोहोचताना त्यांच्या फोनची बॅटरी संपली आणि संपर्काची थोडीथोडकी शक्यताही धुसर झाली. सुदैवानं ही दोन्ही भावंड ज्या मित्रमंडळींशी अखेरचा संवाद साधू शकली होती त्या मित्रांनी तातडीनं ब्रिटीश दूतावासात याबाबतची माहिती दिली. सोशल मीडियावर सूत्र चाळवली आणि या दोन्ही भावांचे फोटो व्हायरल झाले. 

जवळपास 40 तासांनंतर आपल्या जीवात जीव आला, असं सांगत कॅथरिन यांनी मुलांच्या बचावाचा थरार सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर आणला होता. त्यांच्या माहितीनुसार ज्यावेळी बचाव पथकातील पहिली व्ययक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा ते दोघंही बचावले नसल्याचंच त्यांना वाडलं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. ही दोन्ही मुलं बचावली होती, स्पष्टच म्हणावं तर, मृत्यूच्या दाढेतून परतली होती. 

हेही वाचा :  Emotional Video : 16 दिवस कोमात असलेल्या लेकाबद्दल कळताच, आईनं गाठलं रुग्णालयात आणि मग...



Source link