Aryan Khan : आर्यन खानचं मनोरंजनसृष्टीत पदार्पण

Aryan Khan : आर्यन खानचं मनोरंजनसृष्टीत पदार्पण


Aryan Khan First Directorial Project : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) लाडका लेक आर्यन खान (Aryan Khan) आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. आर्यन सिनेसृष्टीत येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होत्या. पण आता या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं आहे. 

आर्यन खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या पहिल्या-वहिल्या प्रोजेक्टची माहिती चाहत्यांना दिली आहे. आर्यन अभिनेता म्हणून नव्हे तर दिग्दर्शक म्हणून सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. बॉलिवूडच्या लोकप्रिय स्टार किडने अभिनयापेक्षा ‘कॅप्टन ऑफ द शीप’ होण्याला पसंती दर्शवल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे. 


News Reels

आर्यनने सोशल मीडियावर संहितेचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे,”संहितेचं काम पूर्ण झालं आहे..आता शूटिंगसाठी प्रतीक्षा करू शकत नाही”. या सिनेमाची निर्मिती शाहरुखच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली करण्यात येणार आहे. 

शाहरुखने दिल्या खास शुभेच्छा

आर्यनने शेअर केलेल्या पोस्टवर शाहरुखची कमेंट लक्षवेधी ठरत आहे. शाहरुखने लिहिलं आहे,”वाह..विचार केला..विश्वास ठेवला आणि आता अखेर स्वप्न पूर्ण होत आहे. पहिला प्रोजेक्ट नेहमीच खास असतो. तुला पहिल्या सिनेमासाठी खूप शुभेच्छा”. तर गौरी खानने ‘आता सिनेमाची प्रतीक्षा’ अशी कमेंट केली आहे. 

हेही वाचा :  नोराच्या तक्रारीनंतर आता जॅकलिन फर्नांडिस काय भूमिका घेणार?

आर्यनचा पहिला प्रोजेक्ट काय आहे?

आर्यन खान नेटफ्लिक्सच्या आगामी वेब सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. पुढच्या वर्षात ही वेब-सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते. तर दुसरीकडे शाहरुखची लेक सुहाना जोया अख्तरच्या आगामी ‘द आर्चीज’ या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. हा सिनेमादेखील नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. 

27 वर्षांच्या आर्यन खानने ‘स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्ट्स’ या कॅलिफोर्नियातील एका महाविद्यालयातून शिक्षण घेतलं आहे. तसेच 2020 मध्ये त्याला बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स, सिनेमॅटिक आर्ट्स आणि टेलिव्हिजन प्रॉडक्शनची पदवी मिळाली आहे.  

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan Net Worth : सलमान, आमीरपेक्षाही संपत्तीच्या बाबतीत शाहरुख ठरतो सरस; बंगला, महागड्या गाड्या अन् बरंच काही



Source link