200 कोटींच्या क्लबमध्ये होणार दृश्यम-2 ची एन्ट्री?

200 कोटींच्या क्लबमध्ये होणार दृश्यम-2 ची एन्ट्री?


Drishyam 2 Day 13 Collection : दृश्यम-2 (Drishyam-2) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.  दृश्यम या चित्रपटाच्या पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागाला (Drishyam 2) देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणच्या (Ajay Devgn) दृश्यम-2 (Drishyam 2) या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात…

‘दृश्यम 2’चे ओपनिंग डे कलेक्शन 15.38 कोटी रुपये होते. या चित्रपटानं 13 व्या दिवशी 4.50-4.90 कोटींची कमाई केली. आता 13 व्या दिवसाच्या कलेक्शननंतर या चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई जवळपास 160 कोटी झाली आहे. हा चित्रपट लवकरच 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे. दृश्यम-2 जर 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला, तर हा अजयचा 200 कोटी कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरेल. 

दृश्यम-2 या चित्रपटाची निर्मिती 50 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे.  ‘दृश्यम 2’ या मल्याळम सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे .अजयच्या 2015 मध्ये रिलीज झालेल्या दृश्यम या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. या चित्रपटाच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी केले होते. 

हेही वाचा :  Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरने पारंपारिक पद्धतीने साजरा केला गुढी पाडवा

‘दृश्यम 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आता या सिनेमाचे डिजिटल राइट्स अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने विकत घेतले आहेत. त्यामुळे आता प्राइम व्हिडीओवर प्रेक्षकांना हा सिनेमा घरबसल्या पाहता येणार आहे. डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षक हा सिनेमा ओटीटीवर प्रेक्षकांना बघता येणार आहे, असं म्हटलं जात आहे. 

News Reels


एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अजय देवगननं या चित्रपटासाठी 30 कोटी मानधन घेतलं आहे. तसेच अभिनेत्री तब्बूनं या चित्रपटासाठी 3.5 कोटी  फी घेतली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया सरननं  दृश्यम-2 मध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी तिनं 2 कोटी एवढं मानधन घेतलं आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Drishyam 2: कुणी 30 कोटी तर कुणी 2 कोटी… ‘दृश्यम-2’ साठी कलाकरांनी घेतलं एवढं मानधन



Source link