Weather Update : नाताळला हुडहुडी वाढणार; पारा 13 अंशांवर, जाणून घ्या तुमच्या शहरातील तापमान

Weather Update : नाताळला हुडहुडी वाढणार; पारा 13 अंशांवर, जाणून घ्या तुमच्या शहरातील तापमान


Maharashtra Weather News : महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात किमान तापमानात चढ-उतार सुरूच असून त्यामुळे थंडीची (Cold Weather) तीव्रताही कमी-अधिक होत आहे. येत्या रविवारपर्यंत (Christmas Day) तापमानात किंचित बदल कायम राहणार असून सोमवारपासून महिनाअखेरपर्यंत थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी हुडहुडी वाढणार आहे. शहरात बुधवारी 13 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. यंदाच्या हिवाळ्यात डिसेंबर महिन्यात तापमानात सर्वाधिक चढ-उतार झाले.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात किमान तापमान घट झाली. सध्या राज्यातील मराठवाड्यासह, विदर्भ आणि पश्चिम महाष्ट्र चांगलाच गारठला आहे. काही ठिकाणी तर तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली आल्याने हुडहु़डी वाढली आहे. परिणामी  25 डिसेंबर मुंबईत (Mumbai weather update ) थंडी वाढणार असल्याच अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच मराठवाड्यात किमान तापमानात चांगलीच घट झाली असून औरंगाबादमध्ये किमान तापमान 10.2 अंश सेल्सिअस आहे.

वाचा : कोरोनाची धास्ती; 1 लाख 61 हजार नागरिकांची आत्महत्या, NCRB ची धक्कादायक आकडेवारी   

येथील नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटवल्या आहेत. तर पुण्यात 11.05 अंश सेल्सिएस तापमानाची नोंद झाली आहे. नागपुरात 12.09 अंश सेल्सिअस, नाशिकमध्ये 13 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर मुंबईत 19.06 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  तापमानात मोठ्या प्रमाणावर चढउतार होत असतांना वाऱ्याचा वेग, हवेतील आर्द्रता, ढगाळ स्थिती याबाबी वातावरणावर परिणाम करणाऱ्या ठरत आहेत. पुढील तीन दिवस तापमानात एक ते दोन अंशाचा चढउतार कायम राहील. रविवारी ख्रिसमस असून त्यानंतर थंडीचा कडाका वाढणार आहे. 

हेही वाचा :  लग्नाआधी बायकोविषयी काही माहीत नव्हतं, नंतर समोर आलं खरं भयाण रूप, आता मी अडकलोय

राज्यामध्ये हळूहळू थंडीचा कहर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या मंदोस चक्रीवादळाचा परिणाम राज्यातील वातावरणावर देखील झाला होता. या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला, तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले होते. सध्या या चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला आहे. परिणामी राज्यात पुन्हा थंडीची हुडहुडी जाणवणार आहे, 

नाताळपासून जाणवणार हुडहुडी

पुढील आठवड्यात किमान तापमानात घट होऊन थंडीची तीव्रता वाढेल. सोबतच दाट धुकेही पडण्याचा अंदाज आहे. 25 ते 31 डिसेंबर दरम्यान उत्तरेतून गार वारे वाहण्याची शक्यता असल्याने उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्रता अधिक असेल. 



Source link