Viral Video : मित्रांच्या चॅलेंजमुळे भर मांडवात नवरदेवाची फजिती; नवरीला कसं बसं उचलून घेतलं पण…

Viral Video : मित्रांच्या चॅलेंजमुळे भर मांडवात नवरदेवाची फजिती; नवरीला कसं बसं उचलून घेतलं पण…


Viral Video : लग्नसोहळा(Wedding) म्हणजे प्रत्येक जोडप्याच्या अयुष्यातील अविस्मरणीय क्षण. नातेवाईक आणि मित्र मंडळी लग्नसोहळ्यात आणखी रंगत आणतात. मात्र,  मित्रांच्या चॅलेंजमुळे भर मांडवात एका नवरदेवाची फजिती झाली आहे. फक्त नवरदेवच नाही नवरीला देखील या प्रकारामुळे वऱ्हाड्यांसमोर लाजल्यासारखे झाले(bride and groom). एका लग्न सोहळ्यातील हा अजब व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

@HasnaZarooriHai नावाच्या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. मात्र, हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे. नवरा आणि नवरीचे नाव काय? याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या व्हिडिओला 14 हजार पेक्षा जास्त व्हिव्हूज आले आहेत. तर, 500 पेक्षा जास्त युजर्सनी या व्हिडिओला लाईक केले आहे. 

लोगो के कहने पर ना चले, अपने सामर्थ्य अनुसार ही कार्य करे, लोग आपकी गलतियों पर हसने को तैयार खड़े हैं। असे कॅप्शन हा व्हिडिओ शेअर करताना देण्यात आले आहे. याचा अर्थ असा कही कुणी सांगेल  तस वागू नका. आपली क्षमता आणि शक्ती पाहून कृती करा. लोक आपल्या कृत्यावर हसण्यासाठी नेहमीच तयार असतात.

हेही वाचा :  हत्तींची एकजूट पाहून गावकरीही पळाले; शक्ती- युक्ती वापरून सगळ्यांचीच झोप उडवली

झालं असं की लग्न सोहळ्यात नवरा नवरीने एकमेकांना वरमाला घातल्यानंतर  नवरदेवाचे मित्र त्याला भलतचं चॅलेंज देतात. नवरी  उचलून स्टेजवरुन खाली उतरायचे असं हे चॅलेंज आहे. नवरदेव मित्रांचे हे चॅलेंज स्वीरतो. पण, हे चॅलेंज त्याला काही झेपच नाही. भर मांडवातच नवरदेवाची फजिती होते. 

नवरदेव सर्व ताकद पणाला लावून नवरीला उचलून घेतो. मात्र, पण त्याला पुढे काही झेपत नाही. थोडीशी हालचाल करताच नवरेदव नवरीला घेऊन स्टेजवरच पडतो. स्टेजवर घडलेला हा प्रकार पाहून लग्न मंडपात उपस्थित असलेले सर्व जण हसू लागतात. नवरदेवाच्या या चॅलेंजमुळे नवरीची देखील फजिती झाली. 

लग्नसोहळ्यातील अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर होतात व्हायरल

सध्या लग्न सोहळ्यातील अनेक प्रकारचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतात. हल्लीच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. गालावर पप्पी घेतल्याशिवाय वरमाला घालून घेणार नाही अशी अट नवरदेवाने घातली होती. भर मंडवात सर्वांसमोर नवरदेवाची पप्पी घायची म्हणजे नवरीसाठी अवघड काम. वरमाला घालणाऱ्या नवरीला नवरदेव सारखा गालाला हात लाहून पप्पी घे अशा इशारा करत होता. शेवटी नवरीने हळूचा त्याच्या गावालर पप्पी घेतली. यानंतर नवरदेवाने वरमाला घालून घेतली. यासह स्वत:च्या लग्नात ढोल वाजवणाऱ्या नवरीचा व्हिडिओ देखील सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झालाय. 

हेही वाचा :  महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल



Source link