सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ; 1 आणि 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्या

सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ; 1 आणि 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्या


Gold Price Today in Maharashtra: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाल्याचे चित्र आहे. मंगळवारी भारतीय वायदे बाजारात सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. चांदीच्या दरातही थोडी वाढ झाली आहे. चांदी या आठवड्यात 94,000वर पोहोचली आहे. सोनंदेखील 72,000 च्या आसपास आहे. तर, मागील आठवड्यात सोनं 75,000 तर चांदी 96,000 वर पोहोचली होती. मात्र, आठवड्याभरातच सोनं दोन ते तीन हजारांनी खाली घसरले आहे. मात्र, आज पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे.

वायदे बाजारात सोन्याच्या किंमती जरी स्थिर असली तरी सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून उसळी घेतल्याचे चित्र आहे. सलग तीन सत्रात सोन्याचे दर कोसळल्यानंतर सोमवार आणि मंगळवार सोनं-चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. पश्चिम आशिया खंडात वाढत्या तणावामुळं आंतराराष्ट्रीय बाजारात मजबूत कल पाहता राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा दरात 220 रुपयांनी वाढ झाली आहे. आज 10 ग्रॅम 24 कॅरेटचे दर 72,930 रुपये इतके आहेत. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 200 रुपयांची घट झाली असून 10 ग्रॅम सोन्याचे दर 66,850 इतके आहेत. 

हेही वाचा :  पाडव्याच्या शुभमुहूर्तावर द्या सोन्याची भेटवस्तू; सोनं-चांदीचे दर इतक्या रुपयांनी स्वस्त

ग्रॅम              सोनं           किंमत

10 ग्रॅम     22 कॅरेट   66, 850 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट   72, 930  रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   54, 700 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत

1 ग्रॅम     22 कॅरेट   6,685 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,293 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5,470 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत

8 ग्रॅम     22 कॅरेट   53,480 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   58,344 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    54,700  रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-  66, 850 रुपये
24 कॅरेट-  72, 930  रुपये
18 कॅरेट-  54, 700 रुपये

हेही वाचा :  Optical Illusion : यासाठी तुम्हाला लागेल शिकाऱ्याची नजर, 10 सेकंदात शोधा टोकनमध्ये दडलेला पेग्विन



Source link