Petrol Diesel Price : सर्वसामान्यांना दिलासा! पेट्रोल डिझेल स्वस्त होणार, जाणून घ्या तुमच्या शहरात किती असेल पेट्रोलचे दर

Petrol Diesel Price : सर्वसामान्यांना दिलासा! पेट्रोल डिझेल स्वस्त होणार, जाणून घ्या तुमच्या शहरात किती असेल पेट्रोलचे दर


Petrol Diesel Price on 20 March 2023 : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या अनेक घडामोडी सुरू आहेत. त्याचा कधी थेट तर कधी नकळत परिणाम कच्चा तेलावर होत असतो. जर आंतरराष्ट्रीय बाजाराच कच्चा तेलाच्या किमती कमी झाल्याने भारतात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Prices) कमी होतील का? भारताला त्याचा फायदा होईल असा दुसरा काही मार्ग आहे का? चला तर मग जाणून घेऊया आज पेट्रोल-डिझेलच्या दरांवर काय परिणाम झाला आहे. 

दरम्यान देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Prices) आज (20 मार्च 2023 ) स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रतिलिटर आहे. तर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (mumbai petrol rate) पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. याशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे. त्याचवेळी कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. भारतीय तेल कंपन्यांनी अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केलेला नाही.

हेही वाचा :  Maharashtra Politics: फडतूस म्हणत ठाकरे आणि फडणवीसांची एकमेकांवर टीका! पण 'फडतूस'चा नेमका अर्थ काय?

वाचा: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; पाहा काय आहेत तुमच्या शहरातील सोन्याचे दर…

मात्र, मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली आहे. ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल 75 डॉलरच्या खाली आहे. परंतु देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर दीर्घकाळ स्थिर आहेत. iocl नुसार, देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे. जिथे किंमत 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती राष्ट्रीय स्तरावर मे 2022 पासून आतापर्यंत अपरिवर्तित आहेत. अशा परिस्थितीत कच्चे तेल स्वस्त होऊनही भारतात पेट्रोल डिझेलचे दर का कमी होत नाहीत आणि तेल कंपन्या किती काळ दर स्थिर ठेवतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 21 मे 2022 रोजी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 8 रुपयांनी आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात केल्यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर दरात कोणताही बदल झालेला नाही. राज्यस्तरीय करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यानुसार बदलतात.

शहर  पेट्रोल रु. प्रतिलिटर  डिझेल रु. प्रति लिटर
दिल्ली  96.72  89.62
मुंबई  106.31  94.27
चेन्नई  102.63  94.24
कोलकाता  106.03  92.76
हेही वाचा :  पुण्यात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त; जाणून घ्या इतर शहरातील इंधनाचे दर

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

घरबसल्या चेक करा नवे  दर 

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 



Source link