Maharashtra Weather News : मान्सूनचा वेग मंदावला; मुंबईसह उपनगरात आकाश ढगाळ, विदर्भाला अद्यापही पावसाची प्रतीक्षा

Maharashtra Weather News : मान्सूनचा वेग मंदावला; मुंबईसह उपनगरात आकाश ढगाळ, विदर्भाला अद्यापही पावसाची प्रतीक्षा


Monsoon Updates : राज्याच्या (Konkan) कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि (Marathwada) मराठवाड्यात मान्सूननं दमदार हजेरी लावली असली तरीही विदर्भात मात्र अद्यापही मान्सून स्थिरावण्याचीच प्रतीक्षा सुरु असल्याचं चित्र आहे. सध्याच्या घडीला देशाच्या दक्षिण भागामध्ये मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग समाधानकारक असला तरीही  बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या मान्सून वाऱ्यांचा वेग काही अंशी मंदावला आहे. मागील 24 तासांमध्ये मुंबईतही पावसाच्या तुरळक सरी वगळता फक्त ढगांची दाटीच पाहायला मिळाली. (Maharashtra Weather News)

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तास मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ राहील, तर काही भागांमध्ये सौम्य मेघगर्जनसह मध्यम पावसाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई या ठिकाणी हवामान खात्यानं ग्रीन अलर्ट लागू केला आहे. तर, पुणे, नगर, धाराशिव, लातूर, सह संपूर्ण विदर्भात हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे. तिथं विदर्भाच्या अमरावती आणि चंद्रपूरात मान्सूननं प्रगती केली असतानाच पूर्व विदर्भात मात्र अद्याप त्यानं दमदार हजेरी लावलेली नाही. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या दक्षिण पश्चिम मान्सून पुढं सरकण्यास वातावरण अनुकूल असून, जम्मू काश्मीरमध्ये समुद्रसपाटीपासून 5.8 किमी उंचीवर एक पश्चिमी झंझावात सक्रिय असल्याचं सांगण्यात येत आहे. 13 जून रोजी हा विक्षोभ आणि चक्रवात पूर्व उत्तर प्रदेशपर्यंत प्रभाव करताना दिसणार आहेत. 

Skymet या खासगी हवामान संस्थेच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्राचा किनारपट्टी भाग, कर्नाटकचा अंतर्गत भाग आणि तेलंगणामध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, आंध्र प्रदेश, लक्षद्वीप, अंदमान निकोबार बेट समूह, दक्षिण छत्तीसगढ आणि आंध्र प्रदेशपर्यंत हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेश, दक्षिण गुजरात, दक्षिण पूर्व राजस्थान या भागांमध्येही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हेही वाचा :  घाणेरडं कोलेस्ट्रॉल मुळापासून उपटून फेकून १०० च्या स्पीडने धावेल रक्त, फक्त दररोज खा १० पदार्थ



Source link