Gate Answer Key 2022: गेट परीक्षेची उत्तरतालिका जाहीर

Gate Answer Key 2022: गेट परीक्षेची उत्तरतालिका जाहीर


GATE 2022 ANSWER KEY:इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खडगपूरने (Indian Institute of Technology Kharagpur, IITKGP) GATE 2022 आन्सर की जाहीर केली आहे. अधिकृत वेबसाइट https://gate.iitkgp.ac.in/ येथे सोमवारी २१ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे, ते उत्तरतालिका अधिकृत बेवसाइटवर जाऊन पाहू शकतात. गेट ही इंजिनीअरिंगच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी परीक्षा आहे.

उमेदवार या उत्तरतालिकेवर आक्षेप असल्यास तोही नोंदवू शकतात. त्यासाठी २२ ते २५ फेब्रुवारी २०२२ पर्यंतची मुदत आहे. आक्षेप असणाऱ्या प्रत्येक प्रश्नासाठी ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. GATE 2022 Answer Keys gate.iitkgp.ac.in या साइटवरून डाऊनलोड करता येणार आहे. उमेदवारांनी हे ध्यानात घ्यावे की गेट परीक्षेचा निकाल लागल्याच्या तारखेपासून तीन वर्षे वैध असते.

यावर्षी गेट २०२२ ची परीक्षा ४ दिवसात घेण्यात आली होती. जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा ५, ६, १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. गेट २०२२ चा निकाल गुरुवार, १७ मार्च २०२२ रोजी ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. सोमवार, २१ मार्च २०२२ पासून उमेदवार त्यांचे स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतील.

हेही वाचा :  सिंगापूरमध्ये भारतीयांच्या नोकऱ्या संकटात, टेक कंपन्यांमध्ये कपातीला सुरुवात

GATE Answer Key: अशी करा डाऊनलोड
१ : सर्वप्रथम, उमेदवार IIT GATE च्या अधिकृत वेबसाइट gate.iitkgp.ac.in वर जा.
२ : त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या GATE Answer Key 2022 च्या लिंकवर क्लिक करा.
३ : आता लॉगिन विंडोवर तपशील भरून लॉग इन करा.
४ : तुमच्या स्क्रीनवर उत्तर तालिका दिसेल.
५ : उत्तरतालिका नीट तपासून घ्या.
६ : आता उत्तरतालिका डाऊनलोड करा.

JAM २०२२ ची उत्तरतालिका जाहीर, आक्षेप नोंदविण्यासाठी ‘येथे’ क्लिक करा

IAF Recruitment 2022: इंडियन एअर फोर्समध्ये विविध पदांची भरती
CMAT Exam 2022: सीएमएटी परीक्षेसाठी ‘येथे’ करा अर्ज, पात्रता निकष जाणून घ्या

Source link