Ayurveda Tips : दही खाताना विसरूनही करू नका ‘या’ 6 चूका, आयुर्वेदाने घातलीये पूर्ण बंदी कारण…!

पांढरे, मलईदार, किंचित आंबट दही हे वैदिक काळापासून आपल्या पूर्वजांच्या आहाराचा मुख्य भाग आहे. आजही लोक जेवणासोबत किंवा जेवणानंतर पचनशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दही खातात. दही हे रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन बी-12 आणि पॅन्टोथेनिक ऍसिडचे पॉवरहाऊस आहे. त्यामध्ये भरपूर प्रमाणात लॅक्टिक ऍसिड असते, जे पोषक तत्वांचे शोषण करण्यास मदत करते. तसे, दही भारतात अनेक प्रकारे वापरले जाते – जसे की दही-भात, दही-साखर, दही रायता आणि बरेच लोक स्मूदी बनवून देखील खातात. नैसर्गिकरित्या उकळलेल्या दुधाला आंबट बनवलेल्या दह्यात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात, जे आपल्या पचनसंस्थेचे पोषण तर करतातच शिवाय रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करतात. आयुर्वेदात अधिक आरोग्यदायी फायदे मिळण्यासाठी दही खाण्याचे काही नियम आहेत. आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार यांनी इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करत दही खाताना आपल्याकडून होणाऱ्या चुकांविषयी सांगितलं आहे आणि त्या टाळण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा :  त्वचेवरील लाल डागांनी हैराण झाला आहात? ताबडतोब युरिक अ‍ॅसिडची चाचणी करा

दूध पचलं नाही तर दही खा

आयुर्वेदानुसार दही चवीला आंबट, प्रकृतीने उष्ण असण्याशिवाय पचायला खूप वेळ लागतो. तसंच ते वजन वाढवण्यासाठी देखील चांगले आहे. याशिवाय शक्ती सुधारण्यासोबत ते कफ आणि पित्त वाढवते आणि अग्नी म्हणजेच पचनशक्ती सुधारण्यासाठी देखील ओळखले जाते. लैक्टोज इनटॉलरेंससोबत कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या गरजांची काळजी घेणाऱ्यांसाठी दही हा एक चांगला पर्याय आहे. कारण दुधातील लॅक्टोजचे रूपांतर लॅक्टिक ऍसिडमध्ये एन्झाईम्सच्या मदतीने केले जाते, जे आंबलेल्या म्हणजेच फर्मेन्टेड बॅक्टेरियामध्ये आढळतात. दही खाताना कोणत्या चूका करू नयेत ते पुढीलप्रमाणे –

(वाचा :- Weight loss Mistake : वेटलॉस करत असाल तर सावधान, 141 किलो वेटलॉस करणं पडलं महागात, एक-एक करून सर्व अवयव झाले निकामी!)

रोज दही खाऊ नका

रोज दही सेवन करू नये असे तज्ज्ञ सांगतात. त्याऐवजी मठ्ठा, ताक खाऊ शकता. त्यात सैंधव मीठ, काळीमिरी आणि जिरे यासारखे मसाले घालतात, जे आरोग्यासाठी चांगले मानले जातात.

(वाचा :- Foods Never Expire : किचनमधील हे 5 पदार्थ कधीच होत नाहीत एक्सपायर, अजिबात करू नका फेकून देण्याची चूक..!)

लठ्ठपणात दही खाऊ नका

ज्या लोकांना लठ्ठपणा, कफ डिसऑर्डर आणि सूज येणे यासारखी स्थिती आहे त्यांनी दह्याचे सेवन टाळावे.

(वाचा :- Blood thinner food : रक्त घट्ट झाल्यामुळे वाढतो ब्लड क्लॉट व हार्ट अटॅक सारख्या भयंकर आजारांचा धोका, रक्त पातळ करण्यासाठी खा ‘हे’ 5 स्वस्तातले पदार्थ..!)

हेही वाचा :  Black Water नक्की काय आहे? डायबिटीजपासून ते वजन कमी करण्यापर्यंत जबरदस्त फायदे

दही फ्रीजमध्ये स्टोर करू नका

घरी बनवलेले दही कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. कारण जसे आपण दही फ्रिजमध्ये ठेवतो तसे त्यातील बॅक्टेरियांची गुणवत्ता कमी होण्यासोबतच त्याचे फायदेही कमी होतात. तर बाजारातील दही थंड असल्यामुळे जास्त जड होते ज्यामुळे ते पचायलाही जड जाते. आयुर्वेदानुसार थंड किंवा बाजारातील दही खाल्ल्याने वजन वाढण्याची शक्यता जास्त असते.

(वाचा :- Pregnancy Weight Loss : लिंबू पाण्यात ‘हा’ पदार्थ मिक्स करून बनवलेलं पेय पिऊन या महिलेने घटवले 25 किलो वजन, करीना कपूर होती इंस्पिरेशन!)

दही कधीच गरम करू नका

दही गरम करू नका असा सल्ला डॉ.भावसार देतात. गरम केल्यानंतर त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात आणि त्याचा आरोग्याला फायदा होत नाही.

(वाचा :- Diabetes diet tips : खाणं तर दूरच, ‘हे’ 6 पदार्थ चाटूनही बघू नका, नाहीतर होऊ शकतो मृत्यूला निमंत्रण देणारा डायबिटीज!)

रात्रीच्या वेळी दही खाऊ नका

आयुर्वेदानुसार रात्री दही खाणे हानिकारक असते. दिवसभरात दही खाणे कधीही चांगले.

(वाचा :- Diabetes diet tips : खाणं तर दूरच, ‘हे’ 6 पदार्थ चाटूनही बघू नका, नाहीतर होऊ शकतो मृत्यूला निमंत्रण देणारा डायबिटीज!)

दही फळांसोबत कधीच मिक्स करू नका

फळांसोबत दही कधीही खाऊ नये. या पद्धतीने दीर्घकाळापर्यंत सेवन केल्याने चयापचय समस्या आणि एलर्जी होऊ शकते.

(वाचा :- Quick weight loss tips : संपूर्ण शरीरावरची चरबी जाईल झटक्यात जळून, करा ‘ही’ 6 अतिमहत्त्वाची कामे!)

मांस व मच्छीसोबत दही खाऊ नका

मांस आणि मच्छीसोब दही खाणे चांगले नाही. चिकन, मटण किंवा मासे यासारख्या मांसासोबत शिजवलेले दही शरीरात विषारी पदार्थ तयार करतात. डॉ.भावसार सांगतात की, आयुर्वेदानुसार रोज दही खाल्ल्याने आरोग्याला अपाय होतो. त्यामुळे जर तुम्हाला दही खायचे असेल तर ते अधूनमधून दुपारी आणि कमी प्रमाणात खाणे हा एक चांगला उपाय आहे.

(वाचा :- Lassa fever : ओमिक्रॉनमध्येच आता लासा तापाने वाढवली चिंता, ‘या’ लोकांना आहे जास्त धोका, लक्षणं व उपाय जाणून घ्या!)

डॉ. दीक्षा भावसारने शेअर केलेली पोस्ट!Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सौंदर्याची खाण पाहिली रूपाली भोसलेचे नऊवारीतील रूप, काळजाची होतेया काहिली

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजना अर्थात रूपाली भोसले नेहमीच सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत …

5 वर्षांच्या भयंकर भांडणानंतर अशी सुरु झाली राम चरण-उपासनाची लव्हस्टोरी

Ram Charan Birthday: साऊथचा सुपरस्टार अभिनेता राम चरणला केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही मागणी आहे. …